Join us  

बाजारात काहीसा दिलासा; मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी; आयटी Index ने तारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 4:08 PM

Share Markets : घसरणीतही निर्देशांकांनी सुटकेचा नि:श्वास टाकल्याचे दिसून आले. कारण कालच्या मोठ्या धक्क्यानंतर आज बाजारात इतकी मोठी घसरण झाली नाही.

Share Markets : बुधवारी (२३ ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. या घसरणीतही इंडेक्स सुटकेचा नि:श्वास सोडताना दिसत आहेत. कारण कालच्या मोठ्या धक्क्यानंतर आज बाजारात तितकी घसरण झाली नाही. तर दुसरीकडे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. आयटी इंडेक्समध्ये जवळपास ३% वाढ झाल्याने बाजारालाही पाठिंबा मिळाला. शेवटच्या तासात नफा बुकिंगमुळे तो घसरणीसह बंद झाला. निफ्टी ३६ अंकांनी घसरून २४,४३५ वर बंद झाला. तर सेन्सेक्स १३८ अंकांनी घसरून ८०,०८१ वर आणि निफ्टी बँक १८ अंकांनी घसरून ५१,२३९ वर बंद झाला.

या शेअर्समध्ये चढउतार आजच्या व्यवहारात बीएसईवर एकूण ४०३१ शेअर्सचे व्यवहार झाले, ज्यात २१८९ शेअर्स वाढीसह बंद झाले तर १७४२ शेअर्स तोट्यासह बंद झाले. १०० शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी ८ शेअर्स वाढीसह आणि २२ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी १८ शेअर्स वाढीसह आणि ३२ शेअर्स तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स ४.९० टक्के, टेक महिंद्रा २.१४ टक्के, टाटा कंझ्युमर १.७८ टक्के, बजाज ऑटो १.७५ टक्के, एचडीएफसी बँक १.२६ टक्के, टीसीएस १.२४ टक्के, तर घसरलेल्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ३.२२ टक्के, सन फार्मा २.६९ टक्के, आयशर मोटर्स २.०७ टक्के, श्रीराम फायनान्स १.८६ टक्के, पॉवर ग्रिड १.८४ टक्क्यांनी घसरले.

आयटी कंपन्यांनी तारलंआजच्या व्यवहारात आयटी शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा आयडी निर्देशांक ९८३ अंकांच्या उसळीसह ४२,२२२ वर बंद झाला. याशिवाय एफएमसीजी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्येही वाढ झाली. पण ऑटो, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, एनर्जी, मेटल, फार्मा आणि बँकिंग समभाग घसरणीसह बंद झाले. गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या घसरणीला ब्रेक लागला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ३६० अंकांच्या वाढीसह आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक २२५ अंकांच्या वाढीसह बंद झाला.

मार्केट कॅपमध्ये वाढआजच्या सत्रात आयटी शेअर्स आणि मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या वाढीमुळे बाजार भांडवलात उसळी आली आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४४५.३९ लाख कोटींवर बंद झाले, जे गेल्या सत्रात ४४४.४५ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये ९४००० कोटी रुपयांची झेप दिसून आली आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकमाहिती तंत्रज्ञान