Join us  

निफ्टी लाईफ टाईम हायवर, सेन्सेक्समध्येही तेजी; Hero च्या शेअर्स वधारले, Axis Bank मध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 9:37 AM

शुक्रवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये झालेल्या वाढीदरम्यान भारतीय शेअर बाजारही तेजीसब उघडला.

Stock Market Open: शुक्रवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये झालेल्या वाढीदरम्यान भारतीय शेअर बाजारही तेजीसब उघडला. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 100 अंकांच्या वाढीसह 73258 अंकांवर तर निफ्टी 31 अंकांच्या वाढीसह 22249 अंकांवर उघडला. शुक्रवारी, गिफ्ट निफ्टी शेअर बाजाराचं कामकाज तेजीनं सुरु करण्याचे संकेत देत होता. शुक्रवारच्या प्री-ओपन मार्केटमध्येही शेअर बाजारात तेजी दिसून आली. गिफ्ट निफ्टी 45 ​​अंकांच्या वाढीसह उघडला होता. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ दिसून आली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ग्रासिम इंडस्ट्रीज, हिरो मोटोकॉर्प, विप्रो, एलटीआय माइंडट्री, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक, ब्रिटानिया, भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, पॉवर ग्रिड आणि एसबीआय लाईफच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

मारुती सुझुकी, रिलायन्स, महिंद्रा, एचसीएल टेक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत होते. शुक्रवारी, गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी चार सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर सहा शेअर्स ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होते. 

अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली, तर अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचं दिसलं. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात आयआरसीटीसी, एचडीएफसी बँक, पतंजली फूड्स, फेडरल बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, मुथूट फायनान्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार