Join us  

Nikhil Kamath यांनी खरेदी केलं घर; पूर्वी रेंटवर राहण्याला म्हणायचे फायद्याचं, 'या'मुळे बदलला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 3:34 PM

Zerodha Nikhil Kamath : देशातील दिग्गज ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत हे घर विकत घेण्याच्या कल्पनेबाबत बराच काळ असहमती दर्शवली होती.

Zerodha Nikhil Kamath : देशातील दिग्गज ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत हे घर विकत घेण्याच्या कल्पनेबाबात बराच काळ असहमती दर्शवली होती. त्याऐवजी भाड्यानं राहणं अधिक फायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आता निखिल कामत यांनी स्वत: हे घर खरेदी केल्याचं समोर आले आहे. नुकताच त्यांनी आपल्या 'डब्ल्यूटीएफ' पॉडकास्टवर याचा खुलासा केला. या पॉडकास्टमध्ये त्यांच्यासोबत इरफान रझाक (अध्यक्ष आणि एमडी, प्रेस्टीज), निरूपा शंकर (कार्यकारी संचालक, ब्रिगेड ग्रुप) आणि करण विरवानी (सीईओ, वीवर्क इंडिया) यांसारखे रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यादरम्यान, बोलताना विरवानी यांनी मजेशीर पद्धतीनं कामथ यांनी सार्वजनिक रित्या ही गोष्ट सांगितली पाहिजे, ज्यामुळे रिअल इस्टेट सेक्टवरील लोकांचा भरवसा वाढेल असं म्हटलं. तर निरुपा शंकर यांनी निखिल आता रिअल इस्टेटचे 'पोस्टर बॉय' बनल्याचं म्हटलं.

घर भाड्यानं घेण्याचे फायदे आहेत, पण एक मोठा तोटा म्हणजे आपल्याला त्या घरातून कधी बाहेर पडावे लागेल हेच कळत नाही, असं कामत यावेळी म्हणाले. "मला त्या घरात अधिक काळ राहण्याची इच्छा असू शकते. यामुळे दीर्घ काळ एकाच ठिकाणी राहण्यासाठी घर खरेदी करणं योग्य ठरू शकतं," असंही ते म्हणाले.

टॅग्स :व्यवसाय