मुंबई-
शेअर बाजारात चढ-उतार हे काही नवीन नाही. यात कोणत्या कंपनीचा स्टॉक कधी एखाद्याला कोट्यवधी रुपये कमावून देईल, तर कधी एखाद्याला श्रीमंताला जमिनीवर आणले काही सांगता येत नाही. गेल्या आठवड्यात रिलायन्सच्या शेअर्समध्येही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. रिलायन्सच्या शेअर होल्डर्सनं गेल्या आठवड्याभरात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. BSE वर लिस्टेट टॉप-१० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप ९०,३१८.७४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
रिलायन्सची मार्केट व्हॅल्यू वाढलीटॉप-१० फर्मच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये झालेल्या या वेगवान वाढीमध्ये मुख्य भूमिका उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीची राहिली आहे. कंपनीच्या शेअरहोल्डर्सची संपत्ती आठवड्याभरात ३६,५६६.८२ कोटी रुपयांनी वाढली आहे. यासोबतच कंपनीचा मार्केट कॅप देखील पुन्हा एकदा वाढ होऊन १७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्सची मार्केट व्ह्यॅल्यूमध्ये वाढ होऊन आता १७,०८,९३२.४२ कोटी रुपये इतकी झाली आहे.
HDFC बँकेनं करुन दिली कमाईरिलायन्सनंतर आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक कमाई करण्याच्याबाबतीत एचडीएफसी बँक देखील स्पर्धेत आहे. बँकेच्या मार्केट कॅपमध्ये ११,१९५.६१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे आणि एकूण मार्केट कॅप आता ८,१२,३७८.५२ कोटी रुपये इतका झाला आहे. याशिवाय भारती एअरटेलच्या मार्खेट व्हॅल्यूमध्ये १०,७९२.६७ कोटींची वाढ होऊन ४,५४,४०४.७६ कोटी रुपये इतकी झाली आहे. तर एसबीआयच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये ८,८७९.९८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या बँकेची एकूण मार्केट व्हॅल्यू ५,०९,३७२.२१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.