Join us

Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 12:43 PM

Niva Bupa IPO : हा आयपीओ ७ नोव्हेंबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि ११ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल. आयपीओ सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे ६ नोव्हेंबरला अँकर गुंतवणूकदार बोली लावू शकतात.

Niva Bupa IPO : आरोग्य विमा कंपनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यांनी आपल्या २,२०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्रति शेअर ७० ते ७४ रुपये प्राईज बँड निश्चित केलाय. ही कंपनी पूर्वी मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी म्हणून ओळखली जात होती. 

हा आयपीओ ७ नोव्हेंबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि ११ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल. आयपीओ सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे ६ नोव्हेंबरला अँकर गुंतवणूकदार बोली लावू शकतात. यापूर्वी आयपीओची साईज आधी ३,००० कोटी रुपये होती, पण आता ती कमी करण्यात आला आहे. यामध्ये ८०० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील तर प्रवर्तक ऑफर फॉर सेल अंतर्गत १,४०० कोटी रुपयांचे शेअर्स विकतील.

ओएफएसमध्ये फॅटल टोन एलएलपी १,०५० कोटी रुपयांचे शेअर्स विकण्याची योजना आखत आहे, तर बुपा सिंगापूर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड ३५० कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. या इश्यूमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी ७५ टक्के, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के राखीव हिस्सा ठेवण्यात आले आहे. सध्या या कंपनीत बुपा सिंगापूर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडचा ६२.१९ टक्के तर फॅटल टोन एलएलपीची २६.८ टक्के हिस्सा आहे.

कंपनी या पैशांचं काय करणार?

इश्यूमधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कंपनी आपला कॅपिटल बेस आणि सॉल्व्हन्सी लेव्हल मजबूत करण्यासाठी करेल. त्यातील काही भाग सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी दिला जाणार आहे. स्टार हेल्थ आणि अलाइड इन्शुरन्स कंपनीनंतर आयपीओ लाँच करणारी ही दुसरी स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, अॅक्सिस कॅपिटल, एचडीएफसी बँक आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स या कंपन्यांनी आयपीओसाठी इनव्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स आहेत. हे शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी लिस्ट करण्याची योजना आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक