Lokmat Money >शेअर बाजार > पैसे तयार ठेवा! 'ही' हेल्थ इन्शूरन्स कंपनी ₹३००० कोटींचा IPO आणणार, जाणून घ्या

पैसे तयार ठेवा! 'ही' हेल्थ इन्शूरन्स कंपनी ₹३००० कोटींचा IPO आणणार, जाणून घ्या

Niva Bupa Health Insurance Company ltd IPO News: आणखी एका लोकप्रिय कंपनीचा आयपीओ लवकरच प्राथमिक बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 04:34 PM2024-07-01T16:34:27+5:302024-07-01T16:34:47+5:30

Niva Bupa Health Insurance Company ltd IPO News: आणखी एका लोकप्रिय कंपनीचा आयपीओ लवकरच प्राथमिक बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

Niva Bupa Health Insurance Company ltd to Bring rs 3000 Crore IPO Know details sebi drhp | पैसे तयार ठेवा! 'ही' हेल्थ इन्शूरन्स कंपनी ₹३००० कोटींचा IPO आणणार, जाणून घ्या

पैसे तयार ठेवा! 'ही' हेल्थ इन्शूरन्स कंपनी ₹३००० कोटींचा IPO आणणार, जाणून घ्या

Niva Bupa Health Insurance Company ltd IPO News: आणखी एका लोकप्रिय कंपनीचा आयपीओ लवकरच प्राथमिक बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बद्दल सांगत आहोत. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनं आयपीओद्वारे ३,००० कोटी रुपये उभे करण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रं (डीएचआरपी) दाखल केली आहेत. या कंपनीचं यापूर्वीचं नाव नाव मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी होतं.

कसा असेल कंपनीचा आयपीओ?

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) दाखल केलेल्या आयपीओ दस्तऐवजानुसार, प्रस्तावित आयपीओमध्ये ८०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि २,२०० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेलचा (फॉल-सेल) समावेश असेल.

कंपनी हे पैसे कुठे वापरणार?

आयपीओमधून उभ्या केलेल्या रकमेपैकी ६२५ कोटी रुपयांचा वापर कंपनीर भांडवली आधार वाढविण्यासाठी, सॉल्व्हन्सी लेव्हल मजबूत करण्यासाठी करण्याच्या विचारात आहे. याशिवाय त्यातील काही रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाणार आहे.

आर्थिक स्थिती कशी?

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा एकूण प्रीमियम ३८११.२५ कोटी रुपये होता. जो वर्षभरापूर्वी २६६२.७५ कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षात कंपनीला ८१.८५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. जो वर्षभरापूर्वी सव्वा कोटी रुपये होता.

Web Title: Niva Bupa Health Insurance Company ltd to Bring rs 3000 Crore IPO Know details sebi drhp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.