Niva Bupa IPO: आरोग्य विमा कंपनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारपर्यंत दुसऱ्या दिवशी हा आयपीओ १.१७ पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, निवा बुपाच्या २०,२६,८२,४०० शेअर्ससाठी बोली लागली होती, तर या आयपीओअंतर्गत १७,२८,५७,१४३ शेअर्सची विक्रीसाठी उपलब्ध आहेत. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा १.५० पट, तर रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा १.३४ पट सब्सक्राइब करण्यात आला. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनं अँकर गुंतवणूकदारांकडून ९९० कोटी रुपये उभे केले आहेत.
इश्यू प्राईज किती?
आयपीओची इश्यू प्राइस ७० ते ७४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. आयपीओ ११ नोव्हेंबरला बंद होणार आहे. हा आयपीओ २,२०० कोटी रुपयांचा आहे. याअंतर्गत ८०० कोटी रुपयांच्या फ्रेश इक्विटी शेअर्स आणि १,४०० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेलचा (ओएफएस) समावेश आहे. ही कंपनी पूर्वी मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी म्हणून ओळखली जात होती.
ग्रे मार्केट प्रीमिअम किती?
दरम्यान, ग्रे मार्केट अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, निवा बुपा आयपीओसाठी ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) सब्सक्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी शून्य राहिला. याचाच अर्थ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये फ्लॅट व्यवहार करत होते. केएफआयएन टेक्नॉलॉजीज आयपीओसाठी रजिस्ट्रार आहे, तर आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, अॅक्सिस कॅपिटल, एचडीएफसी बँक आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स यांचा समावेश आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)