Northern Arc Capital IPO Listing: एनबीएफसी बँकिंग कंपनी नॉर्दन आर्क कॅपिटलचा आयपीओ मंगळवारी (२४ सप्टेंबर) शेअर बाजारात लिस्ट झाला. मंगळवारी एकाच वेळी तीन आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाले, पण नॉर्दर्न आर्क कॅपिटलला जबरदस्त लिस्टिंग मिळालं. कंपनीचा आयपीओ ११०.७१ पट सब्सक्राइब झाला होता. हा आयपीओ ३३.७% प्रीमियमवर लिस्ट झाली आहे. आयपीओसाठी इश्यू प्राइस २४९ ते २६३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. त्या तुलनेत कंपनीचा शेअर बीएसईवर ३५१ रुपयांवर लिस्ट झाला आहे.
एनएसएसईच्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या शेअर विक्रीत २,१४,७८,२९० शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत २,३७,७९,४४,६३९ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणीला २४०.७९ पट, तर नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट विभागाला १४२.२८ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स (आरआयआय) सेगमेंटमध्ये ३०.७४ पट सबस्क्रिप्शन मिळालं.
अँकर गुंतवणूकदारांकडून २२९ कोटी उभे केले
नॉर्दर्न आर्क कॅपिटल लिमिटेडने अँकर (मोठ्या) गुंतवणूकदारांकडून २२९ कोटी रुपये उभे केले होते. आयपीओमध्ये ५०० कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी करण्यात आलेत. याशिवाय प्रत्येकी २७७ कोटी रुपयांच्या १,०५,३२,३२० लाख इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) देखील या इश्यूचा भाग आहे. नव्या इश्यूमधून मिळणारी रक्कम कंपनीच्या भांडवली गरजा भागविण्यासाठी वापरली जाणार आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)