Join us  

शेअर बाजारात लिस्ट होताच शेअर्सनं पकडला स्पीड; तुफान नफ्यानंतर लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 2:58 PM

कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रीमियमसह बाजारात लिस्ट आहेत.

नोवा अॅग्रीटेकनं (Nova Agritech) शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रीमियमसह बाजारात लिस्ट आहेत. नोव्हा ॲग्रीटेकचे शेअर्स शेअर बाजारावर (BSE) 36.59 टक्के प्रीमियमसह 56 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. नोव्हा ॲग्रीटेकच्या आयपीओची किंमत 39 ते 41 रुपये होती. आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स 41 रुपयांना अलॉट करण्यात आले. Nova Agritech चे शेअर्स 34.15 टक्क्यांच्या वाढीसह नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 55 रुपयांवर लिस्ट झाले आहेत.

जबरदस्त फायद्यासह लिस्ट झाल्यानंतर, नोव्हा ॲग्रीटेकचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 58.29 रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 57.75 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीचा आयपीओ 23 जानेवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होता आणि तो 25 जानेवारीपर्यंत खुला होता. कंपनीच्या पब्लिक इश्यूची टोटल साईज 143.81 कोटी रुपये होती. कंपनीच्या IPO मध्ये, किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावता येणार होती. 

113 पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला आयपीओ 

Nova AgriTech चा आयपीओ एकूण 113.21 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमधील रिटेल इनव्हेस्टर्सचा कोटा 80.20 पट सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी, नॉन इनव्हेस्टर्सचा कोटा (NII) 233.03 पट आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (QIB) कोटा 81.13 पट सबस्क्राइब झाला होता. IPO पूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 84.27 टक्के होता, जो आता 59.39 टक्क्यांवर आला आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग