शेअर बाजारात आलोक इंडस्ट्रीजचा शेअर गुरुवारी 11.48 टक्क्यांनी वाधारून 19.90 रुपये प्रती शेअरवर पोहोचला आहे. कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 21.7 रुपये आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास कंपनीचा शेअर 11 टक्क्यांच्या वाढीसह 19.83 रुपये प्रति शेअरवर होता. तर बेंचमार्क एसअँडपी बीएसई सेंसेक्समध्ये 0.11 टक्क्यांची घसरण झाली होती. आतापर्यंत अनेक ब्लॉक डीलच्या माध्यमाने बीएसई आणि एनएसईवर एकूण 116.46 मिलियन शेअर्सचे ट्रांझॅक्शन झाले आहे.
अंबानींच्या एका निर्णयाचा परिणाम -
गेल्या एका महिन्यात बेंचमार्क निर्देशांकात 2 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत स्टॉकमध्ये 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. या दरम्यान, 14 ऑगस्टरोजी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे की, ते चालू आर्थिक वर्षात आपल्या सहकारी कंपन्यांमध्ये जवळफास 14,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यात 7,000 कोटी रुपयांचा सर्वाधिक वाटा आलोक इंडस्ट्रीजला जाईल.
कंपनी संदर्भात थोडक्यात -
महत्वाचे म्हणजे, एआयएलमध्ये 40.01 टक्के वाटा आरआयएलचा आहे. तर जेएम एआरसी कडे 34.99 टक्के वाटा आहे. एआयएल ही भारतातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड कपडा कंपनी आहे. जिचा कॉटन आणि पॉलिएस्टर क्षेत्रात मोठा दबदबा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)