Join us  

IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:04 AM

NSDL Securities : लवकरच डिपॉझिटरी एनएसडीएलचा आयपीओ येणार आहे. आयपीओपूर्वी एनएसडीएलसाठी चांगली बातमी समोर आली आहे.

NSDL Securities : लवकरच डिपॉझिटरी एनएसडीएलचा आयपीओ येणार आहे. आयपीओपूर्वी एनएसडीएलसाठी चांगली बातमी समोर आली आहे. डिमॅट स्वरुपात ठेवलेल्या सिक्युरिटीजचं मूल्य सप्टेंबर २०२४ मध्ये ५०० लाख कोटी रुपये म्हणजेच जवळपास ६ हजार अब्ज रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं (NSDL) दिली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार १०० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना १८ वर्षे लागली. २०२० मध्ये २०० लाख कोटींचा टप्पा गाठण्यासाठी ६ वर्ष लागली आणि ५०० लाख कोटींचा टप्पा गाठण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी लागला.

ही रक्कम भारत, जपान आणि जर्मनीसारख्या देशांच्या जीडीपीपेक्षाही अधिक आहे. भारताचा जीडीपी ३.९४ ट्रिलियन डॉलर्स, जपानचा जीडीपी ४.११ आणि जर्मनीचा जीडीपी ४.५९ ट्रिलियन डॉलर्स आहे. "आम्ही या ऐतिहासिक प्रसंगी गुंतवणूकदार, बाजारातील सहभागी, नियामक आणि इतर भागधारकांचे आभार मानतो," अशी प्रतिक्रिया एनएसडीएलचे हंगामी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) एस गोपालन म्हणाले. एनएसडीएल ही सेबी-नोंदणीकृत मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था आहे जी देशातील वित्तीय आणि सिक्युरिटीज बाजारांना विविध उत्पादनं आणि सेवा प्रदान करते.

NSDL आणणार आयपीओ

देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) बाबत मोठी अपडेट समोर आली होती. बाजार नियामक सेबीनं (SEBI) त्यांच्या बहुप्रतीक्षित आयपीओला हिरवा कंदील दाखवला आहे. आयडीबीआय बँक (IDBI Bank), एनएसई (NSE), एसबीआय (SBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank) एनएसडीएलच्या ५७,२६०,००१ शेअर्सच्या ऑफर फॉर सेलमध्ये आपला हिस्सा विकणार आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये एनएसडीएलनं आयपीओसाठी बाजार नियामकाकडे कागदपत्रं सादर केली होती. 

एनएसडीएलमध्ये आयडीबीआय बँकेचा २६ टक्के, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (एनएसई) २४ टक्के हिस्सा आहे. तर, स्टेट बँक ऑफ इंडियाचा ५ टक्के, युनियन बँक ऑफ इंडियाचा २.८ टक्के आणि कॅनरा बँकेचा २.३ टक्के हिस्सा आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक