Lokmat Money >शेअर बाजार > NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

NTPC Green Energy IPO: पाहा किती आहे जीएमपी आणि किती गुंतवावे लागणार पैसे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:19 PM2024-11-19T12:19:19+5:302024-11-19T12:19:19+5:30

NTPC Green Energy IPO: पाहा किती आहे जीएमपी आणि किती गुंतवावे लागणार पैसे.

NTPC Green IPO rs 10000 crore IPO open for investment from today what to do Experts said know gmp details | NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

NTPC Green Energy IPO: पॉवर क्षेत्रातील दिग्गज कंपनी एनटीपीसीची ग्रीन एनर्जी युनिट असलेल्या एनटीपीसी ग्रीनचा १०,००० कोटी रुपयांचा आयपीओ (ntpc green energy ipo) आज खुला झाला आहे. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या आयपीओची स्थिती चांगली दिसत नाही. आयपीओच्या अपर बँडच्या किंमतीपेक्षा केवळ ७० पैसे म्हणजेच ०.६५ टक्के जीएमपीवर (ntpc green energy ipo gmp today) तो ट्रेड करत आहे. 

मात्र, ग्रे मार्केटमधून संकेत देण्याऐवजी गुंतवणुकीचे निर्णय कंपनीच्या फंडामेंटल आणि फायनान्शिअल्सच्या आधारे घ्यावे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ह्युंदाई मोटरच्या विक्रमी २७,८७० कोटी रुपयांच्या आयपीओ आणि स्विगीच्या ११,३०० कोटी रुपयांच्या आयपीओनंतर एनटीपीसी ग्रीनचा (ntpc green ipo) १०,००० कोटी रुपयांचा आयपीओ हा या वर्षीचा तिसरा सर्वात मोठा इश्यू आहे.

आयपीओबाबत अधिक डिटेल्स

एनटीपीसी ग्रीनच्या १०,००० कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये १०२ ते १०८ रुपयांची प्राईज बँड निश्चित करण्यात आलीये. तसंच यात १३८ शेअर्सचा एक लॉट तयार करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअरवर ५ रुपयांची सूट मिळणार आहे. ७५ टक्के हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (QIB), १५ टक्के नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (NII) आणि १० टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. आयपीओ अंतर्गत शेअर्स वाटप २५ नोव्हेंबर रोजी अंतिम केलं जाईल. त्यानंतर २७ नोव्हेंबरला बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे शेअर्स लिस्ट होती. इश्यूचे रजिस्ट्रार केफिन टेक आहेत.

या आयपीओअंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे ९२५,९२५,९२६ नवे शेअर्स जारी केले जातील. २०० कोटी रुपयांचे शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. याशिवाय एनटीपीसीच्या विद्यमान भागधारकांसाठी एक हजार कोटी रुपयांचे शेअर्स राखीव आहेत. या शेअर्सच्या माध्यमातून जमा झालेल्या रकमेपैकी ७,५०० कोटी रुपये एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी या उपकंपनीचे कर्ज कमी करण्यासाठी आणि उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाणार आहे.

काय म्हणाले एक्सपर्ट्स?

एसबीआय सिक्युरिटीज - एसबीआय सिक्युरिटीजनं दीर्घ मुदतीसाठी याला सब्सक्राईबचा सल्ला दिला आहे.. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, कंपनी आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत आपली परिचालन क्षमता ६ गिगावॅट, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ११ गिगावॅट आणि आर्थिक वर्ष २०२७ मध्ये १९ गिगावॅट पर्यंत वाढवेल. सध्या ते ३.३ गिगावॅट आहे. आर्थिक वर्ष २०२४-२७ मध्ये कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर ७९ टक्के, एबिटा ११७.२ टक्के आणि नफा १२३.८ टक्के चक्रवाढ वाढीच्या दराने (सीएजीआर) वाढण्याची शक्यता आहे.

अरिहंत कॅपिटल - अरिहंत कॅपिटलनंही एनटीपीसी ग्रीन आयपीओ दीर्घ मुदतीसाठी सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे. एनटीपीसी समूहाच्या प्रकल्पांच्या अर्थव्यवस्थेचा फायदा होत राहील आणि नवीन तंत्रज्ञानाद्वारे त्याचा खर्चही कमी होईल, असं ब्रोकरेज कंपनीचे म्हणणे आहे.

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट : पीई रेशोच्या दृष्टीनं आक्रमक प्राईज लक्षात घेऊन स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टच्या वेल्थ हेड शिवानी न्याती यांनी दीर्घ मुदतीसाठीच सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे. मजबूत आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ पाहता त्यांनी त्याला सबस्क्राइब रेटिंग दिलं आहे.

(टीप : यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: NTPC Green IPO rs 10000 crore IPO open for investment from today what to do Experts said know gmp details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.