Join us  

तिसऱ्यांदा शेअर बायबॅक करण्याच्या तयारीत 'ही' कंपनी; घोषणेपूर्वीच रॉकेट बनला शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 2:01 PM

एका मोठ्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. सोमवारी कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संचालक मंडळाची बैठक २२ ऑगस्ट रोजी होणार असून त्यात शेअर बायबॅकचा विचार केला जाईल.

स्मॉलकॅप कंपनी न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजारात मंगळवारी न्यूक्लियस सॉफ्टवेअरचा शेअर २० टक्क्यांनी वधारून १४११.५५ रुपयांवर पोहोचला. एका मोठ्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सनं सोमवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संचालक मंडळाची बैठक २२ ऑगस्ट रोजी होणार असून त्यात शेअर बायबॅकचा विचार केला जाईल.

न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सच्या संचालक मंडळाने २२ ऑगस्टच्या बैठकीत समभागांच्या पुनर्खरेदीला मंजुरी दिल्यास ही कंपनीची तिसरी पुनर्खरेदी असेल. यापूर्वी कंपनीने वर्ष २०१७ आणि २०२१ मध्ये शेअर बायबॅक केले आहे. कंपनीने एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, शेअर बायबॅक निविदा ऑफर मार्गाने किंवा खुल्या बाजाराच्या मार्गाने केली जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल १९५.४ कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २०६.८ कोटी रुपये होता.

न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सच्या संचालक मंडळानं २२ ऑगस्टच्या बैठकीत शेअर्सच्या बायबॅकला मंजुरी दिल्यास ही कंपनीचं तिसरं बायबॅक असेल. यापूर्वी कंपनीनं वर्ष २०१७ आणि २०२१ मध्ये शेअर बायबॅक केलं आहे. कंपनीनं एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार शेअर बायबॅक निविदा ऑफर मार्गानं किंवा खुल्या बाजाराच्या मार्गानं केली जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल १९५.४ कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २०६.८ कोटी रुपये होता.

शेअरमध्ये २४७ टक्के वाढ

न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्टच्या शेअर्समध्ये गेल्या दोन वर्षांत २४७ टक्क्यांची वाढ झाली आहे. १९ ऑगस्ट २०२२ रोजी कंपनीचा शेअर ४०६.८५ रुपयांवर होता. न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्टचा शेअर २० ऑगस्ट २०२४ रोजी १४११.५५ रुपयांवर पोहोचला आहे. तर, गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १८३० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ९६६ रुपये आहे.

कंपनीचा व्यवसाय

न्यूक्लियस सॉफ्टवेअर भारत, सिंगापूर, अमेरिका, जापान, नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांमार्फत कार्यरत आहे. कंपनी बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कॉर्पोरेट ग्राहकांना सॉफ्टवेअर प्रोडक्ट डेव्हलपमेंट, मार्केटिंग आणि सर्व्हिसेस प्रदान करते.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक