नवी दिल्ली-
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडनं (OIL) डिसेंबरच्या तिमाहीचा अहवाल जारी केला आहे. या तिमाहीत कंपनीनं १,७४६.१० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. जो कंपनीचा आजवरचा सर्वाधिक तिमाहीतील नफा आहे. गेल्या वर्षीय याच तिमाहीत १,२४४.९० कोटी रुपये इतका नफा कमावला होता.
डिव्हिडेंट देणार कंपनी
कंपनीच्या संचालक मंडळाने १० रुपये फेस व्हॅल्यूवाले शेअरवर १० रुपयांचा दुसरा डिव्हिडेंट देण्याची घोषणा केली आहे. याआधी कंपनीनं प्रतिशेअर ४.५० रुपये डिव्हिडंट दिला आहे. याप्रमाणे चालू वित्त वर्षात एकूण डिव्हिडंड १४.५० रुपये प्रति शेअर झाला आहे.
नफा वाढण्याची कारणे: कंपनीच्या फायद्यात वाढ होण्यामागचं कारण म्हणजे उत्पादन वाढलं आहे. तसंच तेल आणि गैसच्या विक्रीतून मिळणारा नफा देखील वाढला आहे. तेल आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळेही कंपनीला अधिक फायदा झाला आहे.
ऑइल इंडिया लिमिटेडने डिसेंबरच्या तिमाहीत ८.१ लाख टन कच्च्या तेलाचे उत्पादन केले तर त्याचे गॅस उत्पादन ८०० दशलक्ष घनमीटर इतके होते. तेल आणि वायू उत्पादनासाठी चांगली किंमत आणि त्यांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा कमावल्याचे कंपनीने म्हटले आहे.