महारत्न कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात ऑईल इंडियाचा शेअर ७ टक्क्यांनी वधारून ५९८.५० रुपयांवर पोहोचला. परदेशी ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनली, ऑइल इंडिया लिमिटेडवर बुलिश दिसून येत आहेत. मॉर्गन स्टॅनलीनं ऑईल इंडिया लिमिटेडवर 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवलंय. ब्रोकरेज हाऊसनं महारत्न कंपनीच्या समभागांसाठी ६०० रुपयांपेक्षा अधिकचं टार्गेट दिलंय.
६६३ पर्यंत जाऊ शकतो शेअर
ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीनं ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअर्ससाठी ६६३ रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवलं आहे. मॉर्गन स्टॅनलीनं यापूर्वी ऑईल इंडियाच्या शेअर्सला ४९६ रुपयांचे टार्गेट प्राइस दिलं होतं. अलीकडच्या काळात गॅस उत्पादन दुप्पट केल्यामुळे ऑईल इंडिया लिमिटेडवर (ओआयएल) कंपनी बुलिश असल्याचं त्यांनी म्हटलंय.
वर्षभरात २४० टक्क्यांची तेजी
ऑईल इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये वर्षभरात २४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १२ जुलै २०२३ रोजी कंपनीचा शेअर १७०.३० रुपयांवर होता. १२ जुलै २०२४ रोजी ऑईल इंडियाचा शेअर ५९८.५० रुपयांवर पोहोचलाय. तर महारत्न कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत १३५ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. १२ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर २४९.८७ रुपयांवर होता. ऑईल इंडिया लिमिटेडचा शेअर १२ जुलै २०२४ रोजी ५९८.५० रुपयांवर पोहोचला. इंडिया लिमिटेडने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना ४ वेळा बोनस शेअर दिले आहेत.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)