Lokmat Money >शेअर बाजार > Ola इलेक्ट्रिक IPO: ४.७ कोटी शेअर्सची होणार विक्री; कुठे खर्च होणार पैसे, कंपनीनं सांगितला प्लॅन

Ola इलेक्ट्रिक IPO: ४.७ कोटी शेअर्सची होणार विक्री; कुठे खर्च होणार पैसे, कंपनीनं सांगितला प्लॅन

गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 01:57 PM2023-12-27T13:57:43+5:302023-12-27T13:59:09+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत.

Ola Electric IPO 4 7 crore shares to be sold Where will the money be spent the company told the plan electric vehicle segment investment | Ola इलेक्ट्रिक IPO: ४.७ कोटी शेअर्सची होणार विक्री; कुठे खर्च होणार पैसे, कंपनीनं सांगितला प्लॅन

Ola इलेक्ट्रिक IPO: ४.७ कोटी शेअर्सची होणार विक्री; कुठे खर्च होणार पैसे, कंपनीनं सांगितला प्लॅन

Ola Electric IPO: गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. आता या आयपीओची (IPO) प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. वास्तविक, कंपनीनं आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केलाय. या ५,५०० कोटी रुपयांच्या आयपीओतून, कंपनीनं आपल्या सेल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची क्षमता वाढवण्यासाठी १,२२६.४३ कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. प्लांटची क्षमता पाच गिगावॅटवरून ६.४ गिगावॅटपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे.

काय आहे कंपनीचा प्लॅन?
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडनं गेल्या आठवड्यात बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, आयपीओमधून उभारणार असलेले १,६०० कोटी रुपये संशोधन आणि उत्पादन विकासासाठी खर्च केले जातील, तर आणखी ८०० कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी वापरले जाणार आहेत.

कोण विकतंय हिस्सा?
आयपीओ अंतर्गत, कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल ४७.४ मिलियन किंवा ४.७ कोटी शेअर्स विकतील. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त, गुंतवणूकदार अल्फा वेब व्हेंचर II, डीआयजी इन्व्हेस्टमेंट्स IV AB, इंटरनेट फंड III Pte लिमिटेड, MacRitchie इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, मॅट्रिक्स पार्टनर इंडिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेड III, एलएलसी आणि एसव्हीएफ II ऑस्ट्रिच (DE) एलएलसी हे देखील आपला हिस्सा विकणार आहेत. याशिवाय, आणखी एक गुंतवणूकदार Tekne प्रायव्हेट व्हेंचर्स XV लिमिटेड देखील हिस्सा विकत आहे.

कंपनीनं केलेली ही घोषणा
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनं (OEM) १५ ऑगस्ट २०२३ रोजी इलेक्ट्रिक मोटरसायकल क्रूझर, अॅडव्हेंचर, रोडस्टर आणि डायमंडहेड लॉन्च करण्याची घोषणा केली होती. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत यांची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

महसूल किती?
गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३), ओला इलेक्ट्रिकचा एकूण महसूल जवळपास सहा पटीनं वाढून २,७८२ कोटी रुपये झाला. २०२१-२२ या आर्थिक वर्षात कंपनीच्या ट्रान्सपोर्टेशन व्यवसायाचा एकूण महसूल ४५६ कोटी रुपये होता. आकडेवारीनुसार, ओला इलेक्ट्रिकचे भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ३२ टक्के मार्केट शेअरसह वर्चस्व आहे. दरम्यान, जवळपास १५ वर्षांनी कोणत्या दुचाकी कंपनीचा आयपीओ लॉन्च होणार आहे. यापूर्वी बजाज ऑटोचा आयपीओ २००८ साली आला होता. याद्वारे कंपनीने शेअर बाजारात प्रवेश केला होता.

Web Title: Ola Electric IPO 4 7 crore shares to be sold Where will the money be spent the company told the plan electric vehicle segment investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.