Join us

Ola Electric IPO : सुस्त लिस्टिंग नंतर ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये तेजी; ₹८४ पार पोहोचला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 11:00 AM

Ola Electric IPO : ओला इलेक्ट्रिक आज शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाली. एनएसईवर कंपनीची ७६ रुपयांवर फ्लॅट लिस्टिंग झालं. मात्र यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आल्याचं दिसून आलं.

Ola Electric IPO Listing: ओला इलेक्ट्रिक (ola electric ipo) आज शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाली. एनएसईवर कंपनीची ७६ रुपयांवर (ola electric share price nse) फ्लॅट लिस्टिंग झालं. तर बीएसईवर कंपनीचा शेअर ७५.९९ रुपयांवर (ola electric share price bse) लिस्ट झाला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७६ रुपये होती. कमकुवत लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांच्या अपेक्षांना मोठा धक्का झटका बसला. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सच्या प्रीमियममध्ये मोठी घसरण झाल्यानंतर अशी लिस्टिंग अपेक्षित होती.

खराब लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर ११.९२ टक्क्यांनी वधारून ८७.९२ रुपयांवर पोहोचला. फ्लॅट लिस्टिंगनंतर मात्र या शेअरमध्ये खरेदीचा कल दिसून आला.

काय होती प्राईज बँड, लॉट साईज? (Ola Electric IPO Price Band)

OLA Electric IPO साठी प्राईज बँड (Ola Electric IPO Price Band) ७२-७६ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला होता. याशिवाय एका लॉटमध्ये १९५ शेअर्स होते. कंपनीनं या आयपीओद्वारे ५५०० कोटी रुपयांचे ७२.३७ कोटी नवे शेअर्स जारी केले. सोबतच ६४५.५६ कोटी रूपयांचे ८.४९ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गतही जारी करण्यात आले. ओएफएसमध्ये भाविश अग्रवाल यांच्यासोबत सॉफ्टबँक, टेमासेक, मॅट्रिक्स पार्टनर्स इंडियादेखील आपले शेअर्स विकरणार आहेत. ९ ऑगस्टला म्हणजेच आज कंपनीच्या शेअर्सचं बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग (ola electric ipo listing date) झालं.

रिझर्व्ह हिस्सा

ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी ७५ टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी १५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला होता. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, बोफा सिक्युरिटीज इंडिया, अॅक्सिस कॅपिटल, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि बॉब कॅपिटल मार्केट्स हे आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर होते. तर लिंक इनटाइम इंडिया रजिस्ट्रार होते.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार