Join us  

Ola Electric Share Price: ७६ रुपयांवर आला IPO, ६ दिवसांत १४६ रुपयांपार गेला शेअर; गुंतवणूकदार मालामाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 1:00 PM

Ola Electric Share Price: आज कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. यापुढेही यामध्ये तेजी दिसून येऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आहे. ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये ९ ऑगस्ट रोजी लिस्टिंग नंतर सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी ओला इलेक्ट्रिकचा शेअर १० टक्क्यांनी वधारून १४६.०३ रुपयांवर पोहोचला. यानंतर कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. बाजार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये आणखी वाढ दिसू शकते. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी ७५.९९ रुपये आहे.

६ दिवसांत ९२ टक्क्यांची तेजी

ओला इलेक्ट्रिकचा शेअर ६ दिवसांत ९२ टक्क्यांनी वधारला आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७६ रुपये होती. १९ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर १४६.०३ रुपयांवर पोहोचला. ७६ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ६ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ९२ टक्क्यांची वाढ झाली. ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ २ ऑगस्ट २०२४ रोजी उघडला आणि ६ ऑगस्टपर्यंत खुला राहिला. कंपनीचा आयपीओ एकूण ४.४५ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ४.०५ पट सब्सक्राइब झाला होता. तर, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या श्रेणीत २.५१ पट सबस्क्राईब झाला होता.

काय म्हणाले एक्सपर्ट?

ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये आगामी काळात आणखी तेजी दिसून येऊ शकते. "चार्ट पॅटर्नवर स्टॉक आताही बुलिश दिसत आहे. ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ओलाचा शेअर त्यांनी येत्या काळात १७५ रुपयांच्या टार्गेटप्राईजसाठी तो होल्ड केला पाहिजे. त्यांनी आपला स्टॉप लॉस ९० रुपयांवरुन १३० रुपयांवर अपग्रेड केला पाहिजे. नवे गुंतवणूकदार करंट मार्केट प्राईजवर ओलाचे शेअर्स खरेदी करू शकतात आणि प्रत्येक ५-६ टक्क्यांच्या घसरणीवर ते अॅड करू शकतात," अशी प्रतिक्रिया चॉईस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बगाडिया यांनी दिली.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक