Lokmat Money >शेअर बाजार > या कंपनीचा शेअर 5 दिवसात 75% वाढला; आता 133 रुपयांवर, एक्‍सपर्ट म्हणाले खरेदी करा...

या कंपनीचा शेअर 5 दिवसात 75% वाढला; आता 133 रुपयांवर, एक्‍सपर्ट म्हणाले खरेदी करा...

पाच दिवसांपूर्वी या कंपनीचा आयपीओ लाँच झाला असून सुरु होताच कमी भावावर असलेल्या या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट परतावा दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 02:36 PM2024-08-17T14:36:00+5:302024-08-17T14:36:15+5:30

पाच दिवसांपूर्वी या कंपनीचा आयपीओ लाँच झाला असून सुरु होताच कमी भावावर असलेल्या या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट परतावा दिला

OLA Electric Share sale or buy prediction : This company's stock rose 75% in 5 days; Now at Rs 133, Experts Say Buy... | या कंपनीचा शेअर 5 दिवसात 75% वाढला; आता 133 रुपयांवर, एक्‍सपर्ट म्हणाले खरेदी करा...

या कंपनीचा शेअर 5 दिवसात 75% वाढला; आता 133 रुपयांवर, एक्‍सपर्ट म्हणाले खरेदी करा...

शेअर बाजारात सध्या एक कंपनी भयंकर पैसा कमवून देत आहे. पाच दिवसांपूर्वी या कंपनीचा आयपीओ लाँच झाला असून सुरु होताच कमी भावावर असलेल्या या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट परतावा दिला आहे. जवळपास ७५ टक्के या शेअरच्या किंमती उसळल्या आहेत. ही कंपनी ओला इलेक्ट्रीक आहे. 

ओला इलेक्ट्रीकचा शेअर पाच दिवसांत तीनवेळा अपर सर्किटला स्थिरावलेला आहे. ९ ऑगस्टला या शेअरची लिस्टिंग झाली होती. या शेअरमध्ये कोणी १ लाख रुपये लावले असते तर त्याचे पाच दिवसांत १.७५ लाख रुपये झाले असते. 

शुक्रवारी ओलाचा शेअर १३३ रुपयांवर बंद झाला. याच दिवशी या शेअरने तीनदा अप्पर सर्किटला टच केले. लिस्टिंगवेळी या शेअरची किंमत ७६ रुपये होती. आता ती दुपटीपेक्षा 19 रुपयांनी कमी आहे. कदाचित पुढच्या बाजारादिवशी हा शेअर आणखी १० रुपयांनी ओपनही होण्याची शक्यता आहे. 

HSBC ने या स्टॉकला 'बाय' रेटिंग दिले आहे, यासाठी या शेअरची किंमत 140 रुपये ठेवण्यात आली आहे. ओला इलेक्ट्रीक ही टू व्हीलर कंपनी आहे. 15 ऑगस्ट ओलाने इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये आपली पहिली बाईक लॉन्च केली. या बाईकचे नाव Roadster, Roadster X आणि Roadster Pro असे ठेवले आहे. तसेच कंपनीने अन्य उद्योग वाढीच्या घोषणाही केल्या आहेत. यानंतर शुक्रवारच्या दिवशी लगेचच ओलाच्या शेअरने उसळी घेतली आहे. 
कंपनीचा Q1FY25 तोटा वार्षिक आधारावर रु. 346 कोटी झाला, तर Q1FY24 तोटा रु. 268 कोटी होता. तिमाही ते तिमाही आधारावर कंपनीचा तोटा 418 कोटी रुपयांनी कमी झाला आहे. 
 

Web Title: OLA Electric Share sale or buy prediction : This company's stock rose 75% in 5 days; Now at Rs 133, Experts Say Buy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.