Lokmat Money >शेअर बाजार > Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका

Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका

Ola Electric IPO : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला शुक्रवारी ६,१४५ कोटी रुपयांच्या आयपीओच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:40 PM2024-08-03T12:40:38+5:302024-08-03T12:41:02+5:30

Ola Electric IPO : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला शुक्रवारी ६,१४५ कोटी रुपयांच्या आयपीओच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं.

Ola IPO gets only 35 percent subscription on day 1 The gray market premium down bhavish agarwal selling shares | Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका

Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका

Ola Electric IPO : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला शुक्रवारी ६,१४५ कोटी रुपयांच्या आयपीओच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार ४६.५१ कोटी शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत १६.३१ कोटी शेअर्ससाठी बोली लागली होती. म्हणजेच इश्यूच्या पहिल्याच दिवशी ३५ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं आहे. कंपनीचा आयपीओ ६ ऑगस्टपर्यंत खुला राहणार आहे. इश्यूसाठी प्राईज बँड ७२-७६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय.

किती सबस्क्रिप्शन?

कंपनीच्या आयपीओला बहुतांश किरकोळ गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्यासाठी राखीव असलेला हिस्सा १.५७ पट सब्सक्राइब झाला होता. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टमेंट श्रेणीतील हिस्सा २० टक्के आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टमेंट श्रेणीतील (क्यूआयबी) राखीव हिस्स्यात कोणतीही खास बोली लागली नाही.

ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार शुक्रवारी कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये ९ रुपयांच्या प्रीमिअमवर ट्रेड करत होता. कंपनीच्या जीएमपीमध्येही घसरण दिसून आली. या आयपीओचा जीएमपी जास्तीतजास्त १३ रुपये होता.

काय आहे प्राईज बँड, लॉट साईज (Ola Electric IPO Price Band)

OLA Electric IPO साठी प्राईज बँड (Ola Electric IPO Price Band) ७२-७६ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे. याशिवाय एका लॉटमध्ये १९५ शेअर्स असतील. कंपनी ५५०० कोटी रुपयांचे ७२.३७ कोटी नवे शेअर्स जारी करणार आहे. सोबतच ६४५.५६ कोटी रूपयांचे ८.४९ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गतही आहेत. ओएफएसमध्ये भाविश अग्रवाल यांच्यासोबत सॉफ्टबँक, टेमासेक, मॅट्रिक्स पार्टनर्स इंडियादेखील आपले शेअर्स विकरणार आहे. ९ ऑगस्टला कंपनीच्या शेअर्सचं बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग होईल.

रिझर्व्ह हिस्सा

ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी ७५ टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी १५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, बोफा सिक्युरिटीज इंडिया, अॅक्सिस कॅपिटल, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि बॉब कॅपिटल मार्केट्स हे आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर लिंक इनटाइम इंडिया रजिस्ट्रार आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Ola IPO gets only 35 percent subscription on day 1 The gray market premium down bhavish agarwal selling shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.