Lokmat Money >शेअर बाजार > ₹27 च्या शेअरची कमाल, 5 महिन्यांत 1 लाखाचे केले 3.40 लाख रुपये!

₹27 च्या शेअरची कमाल, 5 महिन्यांत 1 लाखाचे केले 3.40 लाख रुपये!

या कंपनीचा आयपीओ आला होता, तेव्हा त्याचा प्राइस बँड 27 रुपये एवढा होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 01:06 AM2023-01-19T01:06:41+5:302023-01-19T01:25:14+5:30

या कंपनीचा आयपीओ आला होता, तेव्हा त्याचा प्राइस बँड 27 रुपये एवढा होता.

Olatech solutions limited share 1 lakh rupees became 3 40 lakh in 5 months | ₹27 च्या शेअरची कमाल, 5 महिन्यांत 1 लाखाचे केले 3.40 लाख रुपये!

₹27 च्या शेअरची कमाल, 5 महिन्यांत 1 लाखाचे केले 3.40 लाख रुपये!

जर शेअर बाजारात एखाद्या कंपनीचे फंडामेंटल चांगले असेसल, तर तिची चांगला परतावा देण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणावर वाढते. Olatech Solutions Limited हीदेखील एक अशीच कंपनी आहे. या SME कंपनीने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांचे नशीब पालटले आहे. Olatech Solutions Limited ने शेअर बाजारात 29 ऑगस्ट 2022 रोजी जबरदस्त डेब्यू केले आहे.

या कंपनीचा आयपीओ आला होता, तेव्हा त्याचा प्राइस बँड 27 रुपये एवढा होता. BSE SME मध्ये कंपनीची लिस्टिंग 51.30 रुपयांवर झाली होती. अर्थात ज्या गुंतवणूकदाराला कंपनीचे शेअर अॅलॉट झाले असतील, त्याच वेळी त्याला 90 टक्क्यांचा परतावा बाजारात डेब्यू करतानाच मिळाला असेल. महत्वाचे म्हणजे, कंपनीचे शेअर 53.85 रुपयांवर पोहोचत लिस्टिंगच्या दिवशीच बंद झाले होते. 
 
लिस्टिंगनंतरही कंपनीच्या शेअरच्या स्पीडला ब्रेक लागलेला नाही. एक वेळ या एसएमई कंपनीच्या शेअरचा भाव 133 यांच्या रेकॉर्ड लेव्हलपर्यंत पोहोचला होता. मात्र, यानंतर या शेअरमध्ये घसरण दिसून आली आणि तो घसरून 85.80 रुपयांवर आला. या घसरणीनंतरही, कंपनीचे शेअर्स लिस्टिंगपासून आतापर्यंत होल्ड करणारे गुंतवणूकदार फायद्यात आहेत. गेल्या 5 महिन्यांदरम्यान Olatech Solutions Limited ने 200 टक्क्यांहूनही अधिक परतावा दिला आहे. 

5 महिन्यांत ₹1.08 लाखाचे  ₹3.40 लाख रुपये -  
कंपनीने जेव्हा आयपीओ आणला होता, तेव्हा इश्यू प्राईस 27 रुपये एवढी होती. कंपनीकडून 4000 शेअर्सची लॉट साईज ठेवली होती. अर्था एका गुंतवणूकदाराला किमान 1.08 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती. आतापर्यंत होल्ड केल्यानंतर या गुंतवणूकदारांचा पैसा वाढून 3.43 लाख रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Olatech solutions limited share 1 lakh rupees became 3 40 lakh in 5 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.