Join us  

2100 रुपयांवर जाणार हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीकडे 10000 इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 7:23 PM

कंपनीने गेल्या 4 वर्षात 2400% पेक्षा जास्तीचा परतावा दिला आहे.

Olectra Greentech Share : इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे (Olectra Greentech) ने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स गेल्या 4 वर्षांत 2400% पेक्षा जास्त वाढले आहेत. चार वर्षांपूर्वी हे शेअर 72 रुपयांवर होते, जे आता 1800 रुपयांवर गेले आहेत. बुधवारी(26 जून) हा शेअर रु. 1857.80 वर व्यवहार करत होता.

कंपनीचे शेअर्स 2100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स 2100 रुपयांच्याही पुढे जाऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचे कारण म्हणजे, कंपनीकडे सध्या 10000 हून अधिक इलेक्ट्रिक बसेसच्या बनवण्याचे काम सुरू आहे.

प्रभुदास लीलाधरच्या टेक्निकल रिसर्च उपाध्यक्षा वैशाली पारीख सांगतात की, सध्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे शेअर्स काही काळासाठी 1750-1800 रुपयांच्या झोनमध्ये राहतील. त्यांच्या मते हे शेअर्स 2100 ची पातळी ओलांडू शकतात. तर, ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्सना बाय रेटिंग्स दिली आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्ससाठी 2086 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. 

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक