One MobiKwik IPO: डिजिटल पेमेंट कंपनी वन मोबिक्विक सिस्टीम्सचा (One MobiKwik Systems) आयपीओ धमाकेदार ठरला. कंपनीनं १,१८,७१, ६९६ शेअर्ससाठी बोली मागवली होती, तर गुंतवणूकदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत १,४१,७२,६९,५०२ शेअर्ससाठी बोली लावली. म्हणजे हा आयपीओ ११९.३८ पटीनं ओव्हरसब्सक्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांनी १३४.६७ पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा १०८.९५ पट आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा ११९.५० पट सबस्क्राईब झाला.
वित्तीय आणि पेमेंट सेवा, एआय आणि मशीन लर्निंगमधील संशोधन आणि पेमेंट डिव्हाइस पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी कंपनी ५७२ कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओसाठी प्रति शेअर २६५ ते २७९ रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आलाय. ग्रे मार्केटमध्ये हा शेअर १५० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे, जो इश्यू प्राइसपेक्षा ५६% जास्त आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद
मोबिक्विकच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती दिली. कंपनीचा आयपीओ १३४.६७ पट सब्सक्राइब झाला. एकंदरीतच आयपीओबाबत बाजारात प्रचंड उत्साह होता.
काय आहे कंपनीचा प्लान?
या आयपीओच्या माध्यमातून मोबिक्विक ५७२ कोटी रुपये उभारणार आहे. हा पैसा कंपनीच्या विकासासाठी गुंतवला जाणार आहे. कंपनीला आपली आर्थिक आणि पेमेंट सेवा सुधारायची आहे. याशिवाय एआय आणि मशीन लर्निंगमधील संशोधन आणि विकासावरही हा खर्च केला जाणार आहे. पेमेंट डिव्हाइस इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करण्यावरही भर दिला जाणार आहे. आपली सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हे कंपनीचे ध्येय आहे.
जीएमपीची स्थिती काय?
मोबिक्विकनं आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर २६५ ते २७९ रुपये प्राईज बँड निश्चित केली होती. गुंतवणूकदार एका लॉटमध्ये ५३ शेअर्ससाठी बोली लावू शकणार होते. काल ग्रे मार्केटमध्ये हा शेअर १५० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होता. इश्यू प्राइसच्या २७९ रुपयांच्या वरच्या बँडपेक्षा हे प्रमाण ५६ टक्क्यांनी अधिक आहे. गुरुवारी प्रीमियम १५६ रुपये होता. यावरून गुंतवणूकदारांचा कंपनीच्या भवितव्यावर विश्वास असल्याचे दिसून येतं.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)