शेअर बाजारातील पेनी स्टॉक असलेल्या मिनोल्टा फायनान्सच्या शेअरला (Minolta Finance) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. कंपनीच्या शेअरला गुरुवारीही 5% चे अप्पर सर्किट लागले आणि हा शेअर 12.93 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला. ही या शेअरची 52 आठवड्यांतील सर्वात जास्त किंमत आहे.
आज सलग सहाव्या सत्रात कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरच्या तेजीमागे एक मोठे कारण आहे. लिक्विडिटी वाढवण्यासाठी आणि निधी जमवण्यासाठी कंपनीच्या बोर्डाने स्टॉक स्प्लिट आणि राइट्स इश्यूला मंजुरी दिली आहे. यानंतरच ही तेजी आली आहे.
डिसेंबर 2023 मध्ये हा शेअर आपल्या 52-आठवड्यांच्या निचांकी पातळीवर होता. अर्थात ₹6.24 रुपयांवर होता. तो आता दुप्पट वधारला आहे. यात 107 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या तीन व्यवहारांच्या सत्रांत मिनोल्टा फायनान्सच्या शेअरमध्ये 21 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. तर, 2024 मध्ये वार्षिक आधारावर या शेअरमध्ये 88 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षादरम्यान तो 76 टक्क्यांनी वधारला आहे. दीर्घकालावधीत या शेअरने जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार करता, डिसेंबर 2021 मध्ये हा शेअर ₹2.38 वर होता. तो 443 टक्क्यांनी वधारला आहे.
मिनोल्टा फायनान्स लिमिटेडच्या बोर्ड मेंबर्सनी स्टॉक स्प्लिटला मंजूरी दिली आहे. 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय बोर्डाने कंपनीच्या अधिकृत शेअर भांडवलात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासही मंजुरी दिली आहे. अधिकृत भांडवल ₹10.2 कोटींवरून वाढून ₹10 चे दर्शनी मूल्य असलेले 1.02 कोटी इक्विटी शेअर्स (अथवा प्रत्येक विभाजनानंतर 1 रुपया) वाढून ₹60 कोटी होतील. यात 6 कोटी इक्विटी शेअर्सचा समावेश असेल. या बदलासाठी कंपनीला मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या खंड V मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. जे पोस्टल वॉलेटद्वारे शेअरधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)