Join us  

एक ऑर्डर अन् हा शेअर बनलाय रॉकेट, 94 रुपयांवर पोहोचला भाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 7:29 PM

आठवड्यातील व्यवसायाच्या तिसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी बालू फोर्ज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 11 टक्यांहून अधिकची तेजी दिसून आली. 

स्टॉक मार्केटमध्ये एखादी पॉझिटिव्ह बातमी आली तरी शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येते. अशीच एक पॉझिटिव्ह बातमी बालू फोर्ज इंडस्ट्रीजसंदर्भात आली (Balu forge share price) असून या शेअरने रॉकेट स्पीड घेतला आहे. आठवड्यातील व्यवसायाच्या तिसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी बालू फोर्ज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 11 टक्यांहून अधिकची तेजी दिसून आली. 

काय आहे पॉझिटिव्ह न्यूज - बालू फोर्ज इंडस्ट्रीजला मिडल-ईस्टमधील एका ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीकडून पॉवरट्रेन सब-असेंबलीच्या पुरवठ्यासंदर्भात ऑर्डर मिळाली आहे. मात्र ज्या कंपनीकडून ही ऑर्डर मिळाली आहे. त्या कंपनीचा खुलासा झालेला नाही. कॉन्ट्रॅक्टच्या अटीनुसार, बालू फोर्ज इंडस्ट्रीज, पॉवरट्रेन सब-असेंबलीची एका सीरीजचा पुरवठा करेल. याचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅक्टरच्या इंजिन प्रोडक्शनमध्ये केला जाईल, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

शेअरची स्थिती -बालू फोर्जच्या शेअर्समध्ये बुधवारी 11 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. हा शेअर आता 99.85 रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी हा शेअर 89.68 रुपयांवर होता. या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 52 रुपये आहे. तसेच या शेअरने 7 एप्रिल 2022 रोजी 52 आठवड्यांतील उच्चांक 126.45 रुपय गाठला होता. गेल्या सहा महिन्यांत या स्टॉकने 25 टक्क्यांनी वाढून एकाच महिन्यात जवळपास 15 टक्यांची उसळी घेतली आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक