सध्या शेअर बाजार कंपन्यांच्या तिमाही परिणामांची अथवा रिझल्टची चर्चा सुरू आहे. गुंतवणूकदार याच रिझल्टच्या आधारे भविष्यातील योजना आखत आहेत. टाटा ग्रुपच्या ट्रेंट लिमिटेडने (Trent LTD) बुधवारी तिमाही निकाल जाहीर केला. यात कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 46 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम आज कंपन्यांच्या शेअरवरही दिसून आला. ट्रेंटचा शेअर गुरुवारी 6 टक्क्यांहून अधिक वधारला आहे.
52 आठवड्यांतील उच्चांकावर शेअर -
ट्रेंटचा शेअर गुरुवारी आलेल्या तिमाही निकालानंतर BSE वर 1813.95 रुपयांवर खुला झाला. यानंतर पाहता पाहता हा शेअर 1912 रुपये या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला. हा ट्रेंटचा बीएसई वरील 52 आठवड्यांतील नवा उच्चांक आहे. गुरुवारी दुपारी साधारणपणे दोन वाजता कंपनी कंपनीचा शेअर 6.25 टक्क्यांच्या तेजीसह 1902.85 रुपयांवर ट्रेड करत होता.
तिमाही निकालानंतर गुंतवणूकदारांमध्ये आनंद -
ट्रेंटकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनीचा जून तिमाहीतील नेट प्रॉफिट 166.7 कोटी रुपये एवढा आहे. तर गेल्या वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा 114.90 कोटी रुपये एवढा होता. एप्रिल ते जून 2023 दरम्यान ट्रेंटचा रेव्हेन्यू 2628.40 कोटी रुपेय होता. जो गेल्या वर्षाच्या जून तिमाहीच्या तुलनेत 45.8 टक्के अधिक आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)