Join us  

ONGC नं या कंपनीला दिला कोट्यवधींचा कॉन्ट्रॅक्ट, शेअर बनला रॉकेट; गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 8:07 PM

अल्फाजिओचा (इंडिया) शेअर बीएसईवर 276.60 रुपयांच्या मागील पातळीच्या तुलनेत 5.94 टक्क्यांनी वधारून 293.05 रुपयांवर पोहोचला आहे.

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) देहरादूनकडून 39.33 कोटी रुपयांचा कान्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर,  अल्फाजिओ (इंडिया) लिमिटेडचा शेअर आज 6 टक्क्यांनी वधारला. अल्फाजिओचा (इंडिया) शेअर बीएसईवर 276.60 रुपयांच्या मागील पातळीच्या तुलनेत 5.94 टक्क्यांनी वधारून 293.05 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचे मार्केट कॅप वाढून 183.11 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बीएसईवर कंपनीच्या एकूण 5280 शेअर्समध्ये 15.32 कोटी रुपयां व्यवहार झाला आहे.

कंपनीच्या शेअरचा परफॉर्मन्स -तांत्रिक बाबतीत, अल्फाजिओचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) 57.7 वर आहे. यावरून, तो ना ओव्हरबॉट झोनमध्ये व्यवहार करत आहे, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये व्यवहार करत आहे, हे दिसते. अल्फाजिओ स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 0.9 आहे, जो या कालावधीत कमी अस्थिरता दर्शवतो. हा स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर व्यवहार करत आहे.

अल्फाजिओचा शेअर एका वर्षात 11.35 टक्के आणि 2023 मध्ये 13.50 टक्क्यांनी वधारला आहे. दोन वर्षांचा विचार करता अल्फाजिओचा शेअर 110 टक्क्यांनी वधारला आहे. महत्वाचे म्हणजे, 13 सप्टेंबर 2022 रोजी गा शेअर 348 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांकावर पोहोचला, तर 31 मार्च 2023 रोजी 200 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता.

कंपनी काय म्हणते - शेअर बाजाराला देण्यात आलेल्या माहितीत कंपनी म्हणाली, “अल्फाजिओ (इंडिया) लिमिटेडला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा बेसिनच्या OALP ब्लॉक GVONHP2021/2 सेक्टर 2 मध्ये 303 SKM 3D  भूकंपीय डेटा संपादनासाठी ओएनजीसी, देहरादूनकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट जवळपास 39.33 कोटी रुपयांचा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजारपैसा