Lokmat Money >शेअर बाजार > NSE च्या सर्क्युलरमुळे Zerodha ला टेन्शन; ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनाही मोठा झटका, काय आहे प्रकरण?

NSE च्या सर्क्युलरमुळे Zerodha ला टेन्शन; ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनाही मोठा झटका, काय आहे प्रकरण?

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) एक परिपत्रक जारी केलं आहे, ज्यामुळे झिरोदासारख्या (Zerodha) ब्रोकरेज कंपन्या टेन्शनमध्ये आल्या आहेत, शिवाय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनाही धक्का बसू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:51 PM2024-08-22T12:51:00+5:302024-08-22T12:51:39+5:30

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) एक परिपत्रक जारी केलं आहे, ज्यामुळे झिरोदासारख्या (Zerodha) ब्रोकरेज कंपन्या टेन्शनमध्ये आल्या आहेत, शिवाय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनाही धक्का बसू शकतो.

online broking platform zerodha referral programme may discontinue co founder nithin kamath nse new directive will hurt business traders investors | NSE च्या सर्क्युलरमुळे Zerodha ला टेन्शन; ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनाही मोठा झटका, काय आहे प्रकरण?

NSE च्या सर्क्युलरमुळे Zerodha ला टेन्शन; ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनाही मोठा झटका, काय आहे प्रकरण?

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) एक परिपत्रक जारी केलं आहे, ज्यामुळे झिरोदासारख्या (Zerodha) ब्रोकरेज कंपन्या टेन्शनमध्ये आल्या आहेत, शिवाय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनाही धक्का बसू शकतो. एनएसईच्या परिपत्रकामुळे आपला रेफरल प्रोग्राम थांबवावा लागेल, असं झिरोदाच्या सहसंस्थापकांनी बुधवारी सांगितलं. त्याचबरोबर ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांसाठी अतिरिक्त कमाई करण्याचा हा एक मार्ग होता, ज्यामुळे त्यांनाही धक्का बसणारआहे. एनएसईने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या परिपत्रकात ब्रोकरेज कंपन्यांना रेफरलसाठी आपला महसूल वाटून घेण्यास मनाई केली आहे.

Zerodha युझर्सना झटका

एनएसईनं गेल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी केलं. यात ब्रोकरेज महसुलाला रेफरलमध्ये आणण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, वैयक्तिक एक्सचेंजमध्ये नोंदणी केल्यास त्याला रेफरल इन्सेंटिव्ह मिळू शकते. यामुळे ब्रोकिंग व्यवसायाला धक्का बसेल, असं झिरोदाचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे सांगितलं. या परिपत्रकामुळे झिरोधानं आता आपला रेफरल प्रोग्राम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अकाऊंट रेफरलवर मिळणारे ३०० रिवॉर्ड पॉईंट्स कायम राहतील. एएमसी किंवा स्मॉलकेस, टिकरटेप, व्हॉल्ट, एमप्रॉफिट आणि क्विकोसाठी हे रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करता येणारेत.

एनएसईनं का घेतला निर्णय?

गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी एनएसईनं हे परिपत्रक जारी केले आहे. या माध्यमातून सेबी आणि एक्स्चेंजनं ठरवून दिलेल्या मानकांनुसार सर्व व्यवहार होत आहेत, याची खातरजमा करण्याचा प्रयत्न एक्स्चेंजनं केलाय. ब्रोकरेज शेअरिंगला आळा घालून, एनएसईला अनधिकृत योजनांशी संबंधित जोखीम कमी करायची आहे आणि कोणतीही प्रमोशनल अॅक्टिव्हिडी पारदर्शक आणि कायदेशीर चौकटीत आहेत याची खात्री करायची आहे. एनएसईच्या परिपत्रकानुसार आता केवळ नोंदणीकृत संस्थाच रेफरल अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होऊ शकतील. यामुळे फिक्स्ड रिटर्नचे दावे आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांना आळा बसेल.

Web Title: online broking platform zerodha referral programme may discontinue co founder nithin kamath nse new directive will hurt business traders investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.