Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज गुरुवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ७४ अंकांनी घसरून ७३३९२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३ अंकांनी घसरून २२,२९० अंकांवर उघडला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये आणखी घसरण दिसून आली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी फार्मा, निफ्टी आयटी आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली. तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. बजाज ऑटो, एचसीएल टेक, हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, एसबीआय आणि कोटक बँक या कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली, तर लार्सन, टाटा कन्झ्युमर, टेक महिंद्रा, बीपीसीएल, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स आणि एचडीएफसी लाइफ या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
प्री ओपन मार्केटची स्थिती
गुरुवारी बीएसई सेन्सेक्स प्री-ओपन मार्केटमध्ये १०० अंकांच्या घसरणीवर ट्रेड करत होता, तर निफ्टी ७७ अंकांच्या घसरणीवर काम करत होता. शेअर बाजाराचं कामकाज सामान्य नोटवर सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. गुरुवारी निफ्टी ५ अंकांच्या तेजीसह २२३८८ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. त्यामुळे शेअर बाजाराचं कामकाज सुरळीत सुरू होऊ शकतं, असं संकेत मिळत होते.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बीएसई लिमिटेड, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये किरकोळ तेजी दिसून आली. तर आयसीआयसीआय बँक, विप्रो लिमिटेड, ओएनजीसी, एशियन पेंट्स, टीसीएस आणि लार्सनच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ८ कंपन्यांचे शेअर्स गुरुवारी सुरुवातीच्या कामकाजादरम्यान ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते, तर दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
मल्टीबॅगर स्टॉक स्थिती
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबाबत बोलायचं झालं तर जेनसोल इंजिनीअरिंग, आयएसएमटी लिमिटेड, गेटवे डिस्ट्रीपार्क, पिडिलाईट, गरवाडे टेक्निकल फायबर, महिंद्रा हॉलिडेज, सीएमएस इन्फो सिस्टिम्स, फेडरल बँक, युनि पार्ट्स, अशोक लेलँड आणि सर्वोटेक पॉवर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. होम फर्स्ट फायनान्स, पॉलीकॅब इंडिया, कोरोमंडल इंटरनॅशनल, फिनोलेक्स केबल आणि टायटन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.