Lokmat Money >शेअर बाजार > Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला

Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज शुक्रवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ४२६ अंकांच्या वाढीसह ७५०३८ अंकांवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 09:59 AM2024-05-03T09:59:44+5:302024-05-03T09:59:52+5:30

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज शुक्रवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ४२६ अंकांच्या वाढीसह ७५०३८ अंकांवर उघडला.

Opening Bell Markets rally on US jobs data Bajaj Finance shares rise rbi Power Grid falls | Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला

Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज शुक्रवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ४२६ अंकांच्या वाढीसह ७५०३८ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२५ अंकांच्या वाढीसह २२७७३ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप १००, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात चांगली वाढ नोंदविण्यात आली.
 

सर्वाधिक नफा आणि तोटा झालेले शेअर्स
 

शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं, तर बजाज फायनान्स सात टक्क्यांनी वधारला. बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, इंडसइंड बँकेचे शेअर्स वधारले. पॉवर ग्रिड, कोल इंडिया लिमिटेड, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, लार्सन आणि एचडीएफसी लाइफ या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
 

प्री ओपन मार्केटची स्थिती
 

शुक्रवारी प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ४०७ अंकांच्या वाढीसह ७५०१८ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी ११८ अंकांच्या मजबुतीवर २२७७६ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचं कामकाज सामान्य होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. अमेरिकेतील जॉब रिपोर्ट आल्यानंतर आशियाई शेअर बाजारात तेजी होती. गुरुवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. कच्च्या तेलाच्या दरात घसरण आणि देशांतर्गत बाजारातील महागाईचा प्रभाव कमी होण्याच्या आशेनं गुरुवारी शेअर बाजारात तेजी आली.
 

गौतम अदानी समूहाच्या १० लिस्टेड कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर पाच शेअर्स तेजीसह ट्रेड करत होते. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स एक टक्क्यानं घसरले, तर अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये एका टक्क्याची तेजी दिसून आली.

Web Title: Opening Bell Markets rally on US jobs data Bajaj Finance shares rise rbi Power Grid falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.