Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market : JSW स्टील, TATA स्टील, हिंदाल्कोसह 'या' कंपन्यांच्या शेअर्सवर ग्राहकांच्या उड्या; मार्केटमध्ये पुन्हा तेजी

Stock Market : JSW स्टील, TATA स्टील, हिंदाल्कोसह 'या' कंपन्यांच्या शेअर्सवर ग्राहकांच्या उड्या; मार्केटमध्ये पुन्हा तेजी

Stock Market : अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 10:36 AM2024-09-20T10:36:57+5:302024-09-20T10:40:13+5:30

Stock Market : अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

opening bell on september 20th nifty and sensex open high buying in metal sector large cap stocks | Stock Market : JSW स्टील, TATA स्टील, हिंदाल्कोसह 'या' कंपन्यांच्या शेअर्सवर ग्राहकांच्या उड्या; मार्केटमध्ये पुन्हा तेजी

Stock Market : JSW स्टील, TATA स्टील, हिंदाल्कोसह 'या' कंपन्यांच्या शेअर्सवर ग्राहकांच्या उड्या; मार्केटमध्ये पुन्हा तेजी

Stock Market : गेल्या २ दिवसांतील शांततेनंतर भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा जोरदार सुरुवात झाली. शुक्रवारी (२० सप्टेंबर) सेन्सेक्स ४०० अंकांच्या उसळीसह उघडला. निफ्टी देखील सुमारे १०० अंकांच्या वाढीसह २५,५०० च्या वर उघडला. दरम्यान, बँक निफ्टी पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठताना पाहायला मिळत आहे. आज मिडकॅप निर्देशांकातही चांगली वाढ दिसून आली आहे. अमेरीकेतील फेडरल बँकेच्या बैठकीनंतर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे.

लार्ज कॅपमध्ये या कंपन्या ग्राहकांच्या गडारवर
निफ्टी ५० इंडेक्समध्ये गुंतवणूकदार जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, हिंदाल्को, कोल इंडिया, ओएनजीसी सारख्या लार्ज कॅप काउंटरमध्ये स्वारस्य दाखवत आहेत. या कंपन्यातील शेअर्स खरेदी वाढली आहे. धातू क्षेत्रातील लार्ज कॅप स्टॉक्स गुंतवणूकदारांच्या रडारवर दिसत आहेत. दुसरीकडे, निफ्टी 50 पॅकमधूनच टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक आणि सिप्लामध्ये किंचित कमजोरी दिसून येत आहे.

फेडरल बँकेच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम
अमेरिकेतील फेडरल बँकने व्याजदरात ५० बीपीएस कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक परिणाम झाला. निफ्टीने २५ हजार ६०० च्या वर नवा उच्चांक गाठला. उच्चांकी पातळीवर प्रॉफिट बुकींग दिसली असली तरी बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला.

मोतीलाल ओसवालचे रिसर्च हेड तथा वेल्थ मॅनेजमेंट सिद्धार्थ खेमका म्हणाले, “यूएस फेड पॉलिसी जारी करण्यात आली आहे. गुंतवणूकदार इतर तीन केंद्रीय बँकांच्या निकालांवर लक्ष ठेवतील, यामध्ये BOJ, BOE आणि चीनवरील परिणामांवर लक्ष 
ठेवतील. बाजार सकारात्मक परिणामांसह एका रेंजमध्ये राहील.

तेलाच्या किमतीत घसरण
शुक्रवारी आशियाई व्यापाराच्या सुरुवातीच्या भागामध्ये तेलाच्या किमतींमध्ये थोडासा बदल दिसून आला. परंतु, अमेरिकेच्या व्याजदरात मोठी कपात आणि जागतिक संचयनात घट झाल्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात किंमती वाढल्या. भारतातही काही राज्यात इंधन कपात तर काही ठिकाणी दरवाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Web Title: opening bell on september 20th nifty and sensex open high buying in metal sector large cap stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.