Lokmat Money >शेअर बाजार > Opening Bell : शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात, टेक महिंद्रा १० टक्क्यांनी वाढला, आयटीमध्ये तेजी

Opening Bell : शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात, टेक महिंद्रा १० टक्क्यांनी वाढला, आयटीमध्ये तेजी

Opening Bell : शेअर बाजारातील व्यवहार शुक्रवारी सकारात्मकतेनं सुरू झाला. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 169 अंकांच्या वाढीसह 74509 च्या पातळीवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 09:57 AM2024-04-26T09:57:30+5:302024-04-26T09:57:43+5:30

Opening Bell : शेअर बाजारातील व्यवहार शुक्रवारी सकारात्मकतेनं सुरू झाला. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 169 अंकांच्या वाढीसह 74509 च्या पातळीवर उघडला.

Opening Bell Positive start for stock market Tech Mahindra up 10 percent IT up | Opening Bell : शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात, टेक महिंद्रा १० टक्क्यांनी वाढला, आयटीमध्ये तेजी

Opening Bell : शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात, टेक महिंद्रा १० टक्क्यांनी वाढला, आयटीमध्ये तेजी

Opening Bell : शेअर बाजारातील व्यवहार शुक्रवारी सकारात्मकतेनं सुरू झाला. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 169 अंकांच्या वाढीसह 74509 च्या पातळीवर उघडला, तर निफ्टी 50 अंकांच्या वाढीसह 22620 च्या पातळीवर उघडला. निफ्टीमध्ये गुरुवारच्या लेव्हलवरच ओपनिंग दिसून आली. कामकाजाच्या सुरुवातीला निफ्टीवर दबाव दिसून आला आणि पाच मिनिटांतच गुरूवारच्या क्लोजिंगच्या जवळ म्हणजे २२५८० च्या जवळ आला.
 

टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाली असून त्यात 10 टक्क्यांनी तेजी दिसून आली. डिव्हिज लॅबमध्येही दोन टक्के वाढ दिसून येत आहे. ॲक्सिस बँक, एसबीआय डॉक्टर रेड्डीज आणि जेएडब्ल्यूएस स्टील देखील वाढीसह व्यवहार करत आहेत. बजाज फायनान्स, बजाज फिन सर्व्हिस, आयसीआयसीआय बँक आणि टाटा कंझ्युमरच्या शेअर्सवर मात्र विक्रीचा दबाव दिसून येत आहे.
 

गुरुवारी शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली होती आणि निफ्टीनं 22600 चा टप्पाही गाठला. गुरुवारी अमेरिकन बाजारात घसरण झाली असली तरी त्याचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसून आला नाही. सध्या अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल येत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन दिसत आहे.

Web Title: Opening Bell Positive start for stock market Tech Mahindra up 10 percent IT up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.