Lokmat Money >शेअर बाजार > Opening Bell: सेन्सेक्स ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टी १९७०० च्या खाली; इन्फोसिसचे शेअर्स घसरले

Opening Bell: सेन्सेक्स ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टी १९७०० च्या खाली; इन्फोसिसचे शेअर्स घसरले

आठवड्याच्या व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:08 AM2023-10-13T10:08:24+5:302023-10-13T10:08:55+5:30

आठवड्याच्या व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडला.

Opening Bell Sensex hits over 400 points Nifty below 19700 Infosys shares fell | Opening Bell: सेन्सेक्स ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टी १९७०० च्या खाली; इन्फोसिसचे शेअर्स घसरले

Opening Bell: सेन्सेक्स ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टी १९७०० च्या खाली; इन्फोसिसचे शेअर्स घसरले

आठवड्याच्या व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडला. सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला, तर एनएसई निफ्टी 19,700 च्या खाली उघडला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्समध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी मिडकॅप 100 वाढीसह व्यवहार करत होते. त्याच वेळी, इन्फोसिसचा शेअर 3 टक्क्यांच्या घसरणीसब व्यवहार करत होता, तर एंजल वन 4 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता.

गुरुवारी वॉल स्ट्रीटचा मुख्य निर्देशांक घसरणीसह बंद झाला. यामुळे बॉन्ड यिल्डमध्ये वाढ दिसून आली. याचाच परिणाम शुक्रवारी जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बीएसई सेन्सेक्स 274.11 अंकांनी किंवा 0.41 टक्क्यांनी घसरून 66,134.28 वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, NSE निफ्टी 69.20 अंक किंवा 0.35 टक्क्यांच्या घसरणीसह 19,724.80 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

कामकाजादरम्यान प्रमुख २५ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर ५ शेअर्समध्ये वाढ दिसून आली. एचसीएल टेक, टीसीएस, मारुती, बजाज फायनान्स, इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर सुरुवातीला व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये 2.94 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय एमएमटीसी, इन्फिबीम एव्हेन्यू, गेल इंडिया, आयटीआयचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

Web Title: Opening Bell Sensex hits over 400 points Nifty below 19700 Infosys shares fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.