Opening Bell Today: शेअर बाजारातील व्यवहार गुरुवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 175 अंकांनी घसरला आणि 73658 अंकांच्या पातळीवर उघडला. तर निफ्टी 52 अंकांच्या घसरणीसह 22350 अंकांच्या पातळीवर उघडला. प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 250 पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता तर निफ्टी 22330 अंकांच्या खाली ट्रेड करत होता.
प्री-ओपन सत्रात कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 9 टक्क्यांनी घसरले. शेअर बाजाराच्या कामकाजाच्या सुरुवातीला निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांसह, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकांमध्येही घसरण नोंदवली जात होती. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा निर्देशांकात किंचित वाढ दिसून आली.
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
गुरुवारी शेअर बाजारातील ॲक्सिस बँक, आयशर मोटर्स, एचसीएल टेक, पॉवर ग्रेड, हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर कोटक बँक, एलटी, टाटा कंझ्युमर, हल, टायटन, एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाइफ या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
कामकाजादरम्यान गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी पाच लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. तर पाच शेअर्समध्ये घसरण दिसून आली.