Stock Market Open: शेअर बाजारातील कामकाज शुक्रवारी घसरणीनं सुरू झालं. शुक्रवारी, या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स 269 अंकांनी घसरला आणि 72896 अंकांच्या पातळीवर उघडला तर निफ्टी 86 अंकांच्या घसरणीसह 22060 अंकांच्या पातळीवर उघडला.
प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 200 अंकांनी घसरून कामकाज करत होता, तर निफ्टी 22070 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता. शुक्रवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण दिसून आली.
निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक किंचित वाढीसह कामकाज करत होते. शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, ओएनजीसी, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट आणि एसबीआयच्या शेअर्सचा समावेश होता. तर सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्सच्या यादीत बीपीसीएल, ग्रासिम इंडस्ट्रीज, एसबीआय लाईफ, एलटीआय माइंडट्री, इन्फोसिस, ॲक्सिस बँक आणि कोल इंडियाच्या यांचा समावेश होता.
शुक्रवारी, गिफ्ट निफ्टी 120 अंकांच्या घसणीसह उघडला, यावरून शेअर बाजारात घसरणीचे संकेत मिळत होते. यावेळी बाजारातील एका दिवसाच्या वाढीबद्दल उत्साही होण्याची गरज नाही. शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी बाजारात स्थिरतेची वाट पाहावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला.