Join us

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 9:52 AM

Opening Bell Today: बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 293 अंकांनी घसरून 74876 अंकांवर व्यवहार करत होता.

Opening Bell Today: बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स २९३ अंकांनी घसरून ७४८७६ अंकांवर तर निफ्टी ९४ अंकांवर २२७९४ अंकांवर व्यवहार करत होता. बुधवारी सुरू असलेल्या शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. आशियाई शेअर बाजारात बुधवारी घसरण पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान पेटीएमचे शेअर्स पाच टक्क्यांनी वधारले, तर आयनॉक्स विंड्सचे समभाग पाच टक्क्यांनी घसरले. 

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये कार्यरत होते. निफ्टी ऑटो निर्देशांक जवळपास एक टक्क्यांनी घसरला, तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक किंचित घसरणीसह ट्रेड करत होता. हिंदाल्को, भारती एअरटेल, टाटा स्टील, आयटीसी, कोटक बँक, डिव्हिस लॅब आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. तर एसबीआय लाइफ, महिंद्रा, बीपीसीएल, एचडीएफसी लाइफ, इंडसइंड बँक, टाटा कन्झ्युमर आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती 

गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, अशोक लेलँड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स किरकोळ वधारलेय तर टीसीएस, इन्फोसिस, लार्सन, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इरकॉन इंटरनॅशनल, ओएनजीसी आणि इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.  

गौतम अदानी समूहाच्या १० लिस्टेड कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे शेअर्स बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते, तर चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांबाबत बोलायचे झाले तर नाल्को, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, एचएएल, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, हिंदुस्थान झिंक, एनएचपीसी, सेल, कोल इंडिया आणि फेडरल बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार