Join us

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:47 AM

share market special session opening bell : शेअर बाजार शनिवारी विशेष सत्रासाठी खुला आहे. शनिवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसब सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 116.29 अंकांनी वधारून 74,033 अंकांवर उघडला.

share market special session opening bell : शेअर बाजार शनिवारी विशेष सत्रासाठी खुला आहे. शनिवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसब सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 116.29 अंकांनी वधारून 74,033 अंकांवर तर निफ्टी 43 अंकांनी वधारून 22,509 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी बँक 52 अंकांच्या तेजीसह 48,168 च्या स्तरावर, तर निफ्टी आयटी 79 अंकांच्या वाढीसह 33,461 वर उघडला. निफ्टीच्या शेअर्समध्ये ओएनजीसी, पॉवर ग्रिड आणि नेस्ले जवळपास १ टक्क्यांनी वधारले, तर जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी घसरले. 

नेस्ले, पॉवर ग्रिड, हिंडाल्को, हीरो मोटर कॉर्प, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, टायटन कंपनी, अपोलो हॉस्पिटल्स यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. मार्च तिमाहीत वार्षिक १३ कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये ५ टक्के वाढ झाली. निफ्टी मीडिया आणि रियल्टी निर्देशांकात सर्वाधिक तेजी दिसून आली. 

अमेरिकेत महागाई कमी होण्याची शक्यता 

डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 134.21 अंकांनी वधारून 40,003.59 वर बंद झाला. आठवडाभरात डाऊ 1.2 टक्के, एस अँड पी 500 1.5 टक्के आणि नॅसडॅक 2.1 टक्क्यांनी वधारला. दरम्यान, कंझ्युमर प्राईजमध्ये घसरण झाल्याच्या आकडेवारीमुळे आकडेवारीमुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक या वर्षी दोनवेळा व्याजदरात कपात करू शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजार