Join us

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, आयशर मोटर्स घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 9:42 AM

शेअर बाजारातील कामकाज बुधवारी मोठ्या घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 615 अंकांनी घसरून 70935 अंकांच्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: शेअर बाजारातील कामकाज बुधवारी मोठ्या घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 615 अंकांनी घसरून 70935 अंकांच्या पातळीवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 183 अंकांनी घसरून 21,562 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजारात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण दिसून आली. बुधवारी कामकाजादरम्यान निफ्टीते सर्व निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होते. 

बुधवारी, प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 520 अंकांच्या घसरणीसह 71,035 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता, तर निफ्टी 165 अंकांनी घसरून 21,568 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता. अदानी पोर्ट, अदानी एंटरप्रायझेस, सीमेन्स आणि एलटीटीएसच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येऊ शकते, असं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांच्या मते, झोमॅटोचे शेअर्स 187 रुपयांची टार्गेट प्राईज गाठू शकतात. 

वॉल स्ट्रीट अपेक्षेपेक्षा कमकुवत निकाल देत असल्यानं शेअर बाजारातील भावना सावध राहू शकते, असं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेतील महागाईचे आकडे अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहेत, त्यामुळे फेडरल रिझर्व्हला व्याजदर वाढवण्यास भाग पडू शकतं अशीही भीती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार