Join us

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टी आपटला; टाटा मोटर्समध्ये तेजी, पॉवर ग्रीड घसरला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 10:08 AM

शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 210 अंकांनी घसरून 73662 अंकांच्या पातळीवर उघडला.

Opening Bell Today: शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 210 अंकांनी घसरून 73662 अंकांच्या पातळीवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 35 अंकांनी घसरून 22371 अंकांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर यात आणखी घसरण दिसून आली.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक निर्देशांकात घसरण दिसून आली. निफ्टी ऑटो वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात ज्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली त्यात टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा, यूपीएल, भारती एअरटेल, एसबीआय लाइफ आणि आयशर मोटर्सचा समावेश होता. तर पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, सन फार्मा, लार्सन, आयसीआयसीआय बँक आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.  

मंगळवारी, प्री-ओपन ट्रेडमध्ये, बीएसई सेन्सेक्स 100 अंकांच्या घसरणीसह व्यवहार होता, तर निफ्टी 22380 अंकांच्या खाली गेला होता. मंगळवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजादरम्यान गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 9 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते, तर NDTV च्या शेअर्समध्ये किंचित घसरण दिसून आली होती.

टॅग्स :शेअर बाजार