Join us

Opening Bell: सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीसह सुरुवात, टाटा समूहाच्या शेअर्समध्ये नफा वसूली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 9:34 AM

शेअर बाजारातील कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 118 अंकांनी घसरून 74000 च्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: शेअर बाजारातील कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 118 अंकांनी घसरून 74000 च्या पातळीवर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 16 अंकांनी घसरून 22477 च्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजादरम्यान हीरो मोटोकॉर्प, एसबीआय लाइफ, बजाज फायनान्स, सिप्ला, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट आणि डॉ. रेड्डीज यांचे शेअर्स वधारले, तर पॉवर ग्रिड, टाटा स्टील, बीपीसीएल, टाटा कंझ्युमर, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात होती. 

बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजादरम्यान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, कल्पतरू पॉवर, इन्फिबीम आणि गॉडफ्रे फिलिप्स, कमिन्स इंडिया, केईआय इंडस्ट्रीज आणि कॅडिला हेल्थ केअर यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले.

 

तर दुसरीकडे निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. गेल्या आठवड्यात निफ्टी 50 नम 0.69 टक्क्यांची वाढ नोंदवली आणि बीएसई सेन्सेक्स 0.51 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. गेल्या आठवड्यात शेअर बाजार सलग चौथ्यांदा वाढीसह बंद झाला होता, गेल्या 3 महिन्यांतील शेअर बाजाराची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारटाटा