Join us  

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; JSW स्टील घसरला, बजाज ऑटोमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 9:47 AM

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण दिसून आली होती तर, निफ्टी मिड कॅप आणि निफ्टी बीएसई स्मॉल कॅपमध्ये किंचित वाढ झाली.

Opening Bell:  शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 104 अंकांनी घसरला आणि 73,868 अंकांच्या पातळीवर उघडला, तर निफ्टी तीन अंकांच्या घसरणीसह 22458 अंकांच्या पातळीवर उघडला. परंतु त्यानंतर बाजार थोडा सावरला आणि काही वेळात 37 अंकांनी वाढून 74,051.76 वर पोहोचला. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण दिसून आली होती तर, निफ्टी मिड कॅप आणि निफ्टी बीएसई स्मॉल कॅपमध्ये किंचित वाढ झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्येही घसरण नोंदवली जात होती. 

मंगळवारी, प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 8 अंकांच्या वाढीसह 74022 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 22458 अंकांच्या पातळीवर काम करत होता. मंगळवारीही शेअर बाजार सोमवारची वाढ कायम ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो, असं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.  

अदानी समूहाच्या 6 शेअर्समध्ये तेजी 

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, गौतम अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये काम करत होते, तर चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. अदानी पॉवरचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक मजबूतीने व्यवहार करत होते तर एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

या शेअर्समध्ये तेजी / घसरण 

कामकाजादरम्यान अदानी पोर्ट्स, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, भारती एअरटेल, बीपीसीएल, ओएनजीसी आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर विप्रो, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, अपोलो हॉस्पिटल, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार