Join us

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, दिवीज लॅब घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 9:47 AM

बुधवारी शेअर बाजाराचे कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 184 अंकांच्या वाढीसह 74868 अंकांच्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: बुधवारी शेअर बाजाराचे कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 184 अंकांच्या वाढीसह 74868 अंकांच्या पातळीवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 54 अंकांच्या वाढीसह 22697 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.  

निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी फार्मा आणि निफ्टी बँकमध्ये किंचित वाढ झाली. बुधवारी सुरुवातीला टाटा स्टील, हिंदाल्को, भारती एअरटेल, कोल इंडिया, रिलायन्स, आयशर मोटर्स आणि इन्फोसिस यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर दिवीज लॅब, एचडीएफसी बँक, ब्रिटानिया, अदानी, टाटा कंझ्युमर, सन फार्मा आणि डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

प्री-ओपन मार्केटमध्ये, बीएसई सेन्सेक्स 410 अंकांच्या वाढीसह 75094 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 69 अंकांच्या वाढीसह 22711 अंकांच्या पातळीवर काम करत होता. शेअर बाजारातील कामकाज सकारात्मकतेने सुरू होऊ शकेल, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. बुधवारी सकाळच्या कामकाजात आशियाई शेअर बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून आला. 

मल्टी बॅगर शेअरची स्थिती 

बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल  बोलायचं झालं तर, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, विप्रो, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, एचसीएल टेक आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स तेजीत होते तर टीसीएसचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. होते. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात पतंजली फूड्स, आयआरसीटीसी, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, इन्फोसिस, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती.

टॅग्स :शेअर बाजार