Opening Bell Today- गुरुवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 62 अंकांच्या वाढीसह 74 148 च्या पातळीवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 28 अंकांच्या वाढीसह 22502 च्या पातळीवर उघडला. शेअर बाजारातील व्यवहाराची सकारात्मक सुरुवात होऊ शकते असे संकेत गिफ्ट निफ्टी वरून मिळत होते.
गुरुवारी सुरुवातीच्या कामकाजादरम्यान जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, एचडीएफसी लाइफ, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, ओएनजीसी आणि यूपीएल या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ, ब्रिटानिया आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
गुरुवारी सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकात वाढ होत होती, तर निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांक घसरणीसह कार्यरत होते. गुरुवारी प्री मार्केट व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 145 अंकांनी वाढून 74231 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 31 अंकांनी वाढून 22505 अंकांच्या पातळीवर काम करत होता.