Lokmat Money >शेअर बाजार > Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला

Stock Market Open: चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजात चांगली तेजी दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्स ३१८ अंकांच्या वाढीसह ७४०८४ अंकांवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:39 AM2024-05-06T09:39:09+5:302024-05-06T09:39:19+5:30

Stock Market Open: चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजात चांगली तेजी दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्स ३१८ अंकांच्या वाढीसह ७४०८४ अंकांवर उघडला.

Opening Bell Sensex Nifty opens on a bullish note Boom in Kotak Bank Titan hit | Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला

Stock Market Open: चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजात चांगली तेजी दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्स ३१८ अंकांच्या वाढीसह ७४०८४ अंकांवर तर निफ्टी ८६ अंकांच्या वाढीसह २२५६१ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये कोटक बँक, ब्रिटानिया, बजाज फायनान्स, टाटा स्टील, आयशर मोटर्स, एचसीएल टेक आणि टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता. तर टायटन, एसबीआय, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायजेस, सिप्ला आणि पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
 

सोमवारच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी फार्मा निर्देशांक वगळता जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये चांगली वाढ नोंदविण्यात आली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, बीएसई लिमिटेड, एचसीएल टेक, ओएनजीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एशियन पेंट्स, इन्फोसिस, विप्रो, एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी होती, तर लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये घसरम दिसून आली.
 

अदानी समूहाच्या कंपन्यांची स्थिती
 

सोमवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ७ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह ट्रेड करत होते. तर तीन शेअर्समध्ये किरकोळ वाढ नोंदवण्यात आली.
 

प्री ओपनिंगमध्ये काय स्थिती?
 

सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. आशियाई शेअर बाजारात सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली. प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ३४१ अंकांच्या तेजीसह ७४२१९ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी ८६ अंकांच्या वाढीसह २२५६२ अंकांवर व्यवहार करत होता.

Web Title: Opening Bell Sensex Nifty opens on a bullish note Boom in Kotak Bank Titan hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.