Join us  

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 9:36 AM

Stock Market Open: चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजाला तेजीनं सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ९५ अंकांच्या वाढीसह ७३,२०० अंकांवर उघडला.

Stock Market Open: चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजाला तेजीनं सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ९५ अंकांच्या वाढीसह ७३,२०० अंकांवर तर निफ्टी ३८ अंकांच्या वाढीसह २२,२५६ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फार्मा इंडेक्स मध्ये किरकोळ घसरण नोंदवली जात होती, तर इतर सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. 

सिप्ला, भारती एअरटेल, बीपीसीएल, कोल इंडिया, ओएनजीसी, हिंडाल्को आणि एसबीआय या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स, श्रीराम फायनान्स, एशियन पेंट्स, एचडीएफसी लाइफ, एचडीएफसी लाइफ आणि स्पाइसजेट या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. 

प्री ओपन मार्केटची स्थिती काय? 

बुधवारी प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ९३ अंकांच्या वाढीसह ७३१९७ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी ४० अंकांच्या वाढीसह २२२५८ अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचं कामकाज तेजीनं सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. जागतिक शेअर बाजारातील तेजी पाहता देशांतर्गत शेअर बाजारही बुधवारी सुरू होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. बुधवारी आशियाई शेअर बाजारात तेजी होती. बुधवारी कच्च्या तेलाच्या दरातही वाढ झाल्याचं दिसून आलं.

टॅग्स :शेअर बाजार