Join us  

opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; ITC मध्ये ६% ची तेजी, पॉवर ग्रीड घसरला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 9:36 AM

शेअर बाजारातील कामकाज बुधवारी तेजीसह सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसीई सेन्सेक्स 274 अंकांच्या वाढीसह 73907 अंकांच्या पातळीवर उघडला.

Opening Bell Today: शेअर बाजारातील कामकाज बुधवारी तेजीसह सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसीई सेन्सेक्स 274 अंकांच्या वाढीसह 73907 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 56 अंकांच्या वाढीसह 22391 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी ऑटो वगळता सर्व निर्देशांक तेजीसह काम करत होते.  

शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये आयटीसी, विप्रो, एचसीएल टेक, टीसीएस, एलटीआय माईंडट्री, एसबीआय लाईफ आणि एचडीएफसी लाईफ या शेअर्सचा समावेश होता, तर सुरुवातीच्या कामकाजादरम्यान पॉवर ग्रिड, एनटीपीसी, भारती एअरटेल, एचयुएल, कोल इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि ओएनजीसीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. 

बुधवारी, प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 325 अंकांच्या वाढीसह 73993 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 96 अंकांच्या वाढीसह 22432 अंकांच्या पातळीवर काम करत होता. बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज सकारात्मक सुरू होऊ शकतं असे गिफ्ट निफ्टीकडून संकेत मिळाले होते. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 4286 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. फेब्रुवारीमध्ये भारतातील महागाईचा दर नियंत्रणात आहे, तसंच अमेरिका आणि वॉल स्ट्रीटकडून येणारी आकडेवारी सकारात्मक आहे.

टॅग्स :शेअर बाजार