Stock Market Open: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी, शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान बीएसई सेन्सेक्स 447 अंकांच्या वाढीसह 74098 अंकांवर तर निफ्टी 157 अंकांच्या वाढीसह 22483 अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीला निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकासह जवळपास सर्व निर्देशांकांनी वाढ नोंदवली.
बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी मिड कॅप, निफ्टी फार्मा इंडेक्स आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स एक टक्क्याहून अधिक वधारले. कामकाजाच्या सुरुवातीला बजाज फिनसर्व्ह, ग्रासिम इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर व्हीआयपी इंडस्ट्रीज, एजिस लॉजिस्टिक्स, सुझलॉन एनर्जी, पर्सिस्टंट सिस्टम, एस्टर डीएम आणि केन्स टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर 4 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत होते, तर अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडचे समभागही सुमारे एक टक्क्यांनी वाढले होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ग्लोबस स्पिरिट, उर्जा ग्लोबल, ओम इन्फ्रा, कामधेनू लिमिटेड, पटेल इंजिनीअरिंग, इंजिनियर्स इंडिया, युनी पार्ट्स, यूपीएल लिमिटेड या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.