Join us

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 9:51 AM

Opening Bell Today: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 84 अंकांच्या तेजीसह 74037 अंकांवर खुला झाला.

Opening Bell Today: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 84 अंकांच्या तेजीसह 74037 अंकांवर तर निफ्टी 47 अंकांच्या तेजीसह 22576 अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी आयटी, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात तेजी होती, तर निफ्टी बँक निर्देशांक घसरणीवर काम करत होता.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये डॉ. रेड्डीज, ब्रिटानिया, कोल इंडिया, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट, डिव्हिस लॅब आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता, तर सर्वाधिक घसरलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एसबीआय, महिंद्रा, सन फार्मा, हीरो मोटो, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड आणि श्रीराम फायनान्सच्या समभागांचा समावेश होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये इंजिनीअर्स इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स, विप्रो, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स वधारले, तर एचडीएफसी बँक आणि इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. 

प्री ओपन मार्केटची स्थिती 

प्री ओपन व्यवहारात शेअर बाजार 373 अंकांच्या वाढीसह 74,326 अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 70 अंकांच्या वाढीसह 22,598 वर खुला झाला होता. बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज सामान्य नोटवर सुरू होऊ शकतं असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. तर आशियाई शेअर बाजारात बुधवारी घसरण दिसू आली होती. 

व्याजदरांवर नजर 

अमेरिका आणि ब्रिटनमधील व्याजदरात होणाऱ्या बदलाकडे जगभरातील ट्रेडर आणि गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या महागाईच्या ताज्या आकडेवारीनंतर रिझर्व्ह बँक व्याजदर शिथिल करण्याच्या दृष्टीनं सोयीस्कर स्थितीत नसल्याचं दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवण्यात आली आहे. 

टॅग्स :शेअर बाजार