Join us

Opening Bell : सेन्सेक्स निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, टेक महिंद्राचे शेअर्स घसरले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:31 AM

कामकाजादरम्यान शेअर बाजार ६०० पेक्षा अधिक अंकांनी घसरला.

Opening Bell : शेअर बाजारातील कामकाजाची सुरुवात गुरुवारी घसरणीसह झाली. कामकाजादरम्यान बीएसई सेन्सेक्स सकाळी 10 च्या सुमारास 600 पेक्षा अधिक अंकांनी घसरुन 70460 अंकांच्या व्यवहार करत होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 154 अंकांच्या घसरणीसह 21299 च्या पातळीवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांक वाढ नोंदवत होते तर निफ्टी आयटीमध्ये घसरण दिसून आली.शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात हिंदाल्कोच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती तर डॉ रेड्डीज, टाटा स्टील, एचसीएल टेकचे शेअर्स घसरणीसह उघडले. आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स गुरुवारी सुरुवातीच्या घसरणीसह ट्रेड करत होते, तर एशियन पेंट्स आणि अदानी पोर्ट्समध्ये किंचित वाढ दिसून आली.शेअर बाजार विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार भारतीय शेअर बाजाराचं मूल्यांकन वाढल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार नफावसूली करत आहेत. यासोबतच तिसऱ्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा कमकुवत निकालांमुळे शेअर बाजारात विक्री आणि प्रॉफिट बुकिंग दिसू शकते. गुरुवारी, प्री-ओपन मार्केटमध्ये, बीएसई सेन्सेक्स 38 अंकांच्या कमजोरीसह 71022 च्या स्तरावर कार्यरत होता, तर निफ्टी 21454 च्या पातळीवर कार्यरत होता.या शेअर्समध्ये तेजीगुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात मल्टीबॅगर शेअर्समध्ये ब्रँड कॉन्सेप्ट, एनएमडीसी, पटेल इंजिनीअरिंग, एचडीएफसी लाइफ, ग्लोबस स्पिरिट, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, जिओ फायनान्शियल, युनि पार्ट्स इंडिया, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, कोटक महिंद्रा आणि नेस्ले यांचा समावेश होता. तर आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, देवयानी, कामधेनू आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक