Join us  

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; टाटा स्टील घसरला, NTPC मध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 9:37 AM

सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 128 अंकांच्या वाढीसह 73934 अंकांच्या पातळीवर कामकाज करत होता.

Stock Market Open Today: सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 128 अंकांच्या वाढीसह 73934 अंकांच्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 33 अंकांच्या वाढीसह 22412 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक तेजीत होते. तर निफ्टी आयटी आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक घसरणीसह काम करत होते. 

एनटीपीसी, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, बजाज ऑटो, सन फार्मा, ओएनजीसी आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये कामकाजाच्या सुरुवातीला तेजी दिसून आली. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार निफ्टी अल्पावधीत 22800 चा स्तर गाठू शकतो.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात नेस्ले इंडियासह जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, बीपीसीएल, आयशर मोटर्स, एसबीआय लाईफ आणि टायटनच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सोमवारी प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स 98 अंकांनी वधारून 73904 च्या पातळीवर, तर निफ्टी 25 अंकांनी वाढून 22403 च्या पातळीवर ट्रेड करत होता.

टॅग्स :शेअर बाजारटाटाशेअर बाजार